अमृता करवंदेने अनाथांच्या हक्कांचा एक मोठा लढा जिंकला आहे
अमृता करवंदे ही तरुणी स्वत: अनाथ असून अनेक अनाथ मुलांसाठी काम करत आहे. वयाच्या १८व्या वर्षी अनाथाश्रमातून बाहेर पडल्यानंतर अमृताने अनाथ मुलांसाठी काम करण्यास सुरुवात केली. अमृताने अनाथांच्या हक्कांचा एक मोठा लढा जिंकला आहे. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अमृताने केलेल्या संघर्षाची दखल घेत राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथ मुलांना आरक्षण लागू केले. अनाथांचे आयुष्य सावरण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अमृताच्या आयुष्याची कहाणीही तितकीच संघर्षपूर्ण आहे. संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरलेली अमृता ही आजच्या काळातील नवदुर्गाच आहे.
‘जागर नवदुर्गांचा’ या नवरात्र विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने अमृता करवंदेचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत.