आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदीबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा

२३ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद

करोनामुळे संपूर्ण देशात २५ मार्चपासून लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. त्या पूर्वी २३ मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली. सुरुवातीला ही बंदी एक आठवड्यासाठी म्हणजेच २९ मार्चपर्यंत होती. त्यानंतर पुढे जसजसा लॉकडाउन वाढत गेला तसतशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर देखील बंदी वेळोवेळी वाढवण्यात आली.

ट्रेन वाहतुकीवरही १२ ऑगस्टपर्यंत बंदी

देशातील रेल्वे वाहतूक १२ ऑगस्टपर्यंत बंदच राहील असे रेल्वेने २५ जूनला जाहीर केले होते. या काळात केवळ विशेष गाड्याच तेवढ्या चालवल्या जातील, असे रेल्वेने स्पष्ट केले होते. रेल्वेच्या जुन्या आदेशानुसार, ३० जून पर्यंत ट्रेनची वाहतूक रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला होता. अशा परिस्थितीत जर कोणी १ जुलै ते १२ ऑगस्ट या काळात तिकिट बुक केले असले तर अशा प्रवाशांना रिफंड मिळणार आहे.

हे वाचले का?  AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी

देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या ५ लाखांच्या आसपास

संपूर्ण देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण देशात आतापर्यंत करोनाची लागण झाल्यानंतर १५ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात जवळपास ५ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. देशभरात दररोज १६ हजार ते १७ हजार नव्या करोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. देशातील दिल्ली, मुंबई, तामिळनाडू आणि गुजरातसारख्या शहरे आणि राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत सरकारला वाटले तरी ट्रेन, विमान वाहतूक आणि बस वाहतुकीला खुली सूट मिळेल असे वाटत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

सौजन्य :महाराष्ट्र टाईम्स