आता फक्त १५ तास शिल्लक! बुलेट ट्रेन, ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं काय झालं? राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल, आश्वासनांची करून दिली आठवण!

नव्या वर्षाची सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत.

नव्या वर्षाची सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. २०२२ या वर्षात मोदी सरकारने जनतेला अनेक आश्वासनं दिली. यातील काही आश्वसनं पूर्ण झाली तर काही आश्वासनं अद्याप अपूर्णच आहेत. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीने भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. नवे वर्ष सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे आश्वासनांचं काय झालं? असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

राष्ट्रवादीने भाजपा तसेच मोदी सरकारवर ट्वीटच्या माध्यमातून टीका केली आहे. या ट्वीटमध्ये भाजपाने दिलेली आश्वासाने तसेच आश्वासनांच्या पूर्ततेवर भाष्य करण्यात आले आहे. ‘२०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाकडे घर असेल. २०२२ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. २०२२ पर्यंत भारतातील प्रत्येक घरात २४ तास वीज असेल. २०२२ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार, अशी अनेक आश्वासनं मोदी सरकारने दिली होती. आता २०२३ हे नवे वर्ष सुरू होण्यास १५ तास शिल्लक आहेत,’ असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.