“आदित्य ठाकरे इथे फार कमी वेळ होते, पण छाप पाडून गेले”; अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या कार्याला जी गती मिळाली ती अयोध्येच्या भूमीतून मिळाली, असेही संजय राऊत म्हणाले

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, राजन विचारे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह शिवसेनेचे नेते व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अयोध्येत २०१८ मध्ये येऊन ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. आजही मी श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ही तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नव्हे. वचनपूर्ती हेच आमचे हिंदुत्व आहे आणि भक्ती हीच शक्ती आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यात केले.

हे वाचले का?  Sanjay Raut : “मातोश्रीवर आलेले मुस्लिम लोक एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक, आम्ही..”; संंजय राऊत यांनी फोटो दाखवत केला ‘हा’ आरोप

यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “आदित्य ठाकरे इथे फार कमी वेळ होते. पण त्यात ते छाप पाडून गेले. संपूर्ण देशासह महाराष्ट्राने हे कार्यक्रम पाहिले. हा नेत्रदिपक सोहळा गेल्या अनेक वर्षात इथे झाला नाही असे इथले स्थानिक सांगत होते. या कोणत्याही कार्यक्रमाला राजकीय स्वरुप नव्हते. शरयूच्या घाटावर जो सोहळा आपण अनुभवला तो आध्यात्मिक होता. आदित्य ठाकरे तन्मयतेने या आरतीमध्ये सहभागी झाले. हिंदुत्वाचा विचार घेऊन आदित्य ठाकरे आणि आम्ही येथे आलो आणि जातानाही तोच विचार घेऊन महाराष्ट्रात गेलो,” असे संजय राऊत म्हणाले.

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”

“या पुढचे लक्ष महाराष्ट्रात काम करणे आहे. वारंवार आम्ही अयोध्येला येतो याचे कारण हेच आहे की, शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या कार्याला जी गती मिळाली ती अयोध्येच्या भूमीतून मिळाली. त्यामुळे वारंवार आमची पावले अयोध्येकडे वळतात,” असेही संजय राऊत म्हणाले.

“उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय आदित्य ठाकरेंनी जाहीर केला. १९९२ च्या आंदोलनावेळी महाराष्ट्रातून हजारो लोक इथे आले आहेत. फक्त शिवसेनेचे आले असं मी कधीच म्हणणार नाही. आजही इथे लोक बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढतात. महाराष्ट्रातून हजारो लोक इथे येतात त्यामुळे त्यांच्यासाठी वास्तू असावी अशी विनंती मुख्यमंत्र्याकडे केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकार सोबत संवाद सुरु झाला आहे. भव्य अशी ही वास्तू असेल. महाराष्ट्राचे अयोध्येशी असलेले नाते दर्शवणी ही वास्तू असेल,” असे संजय राऊत म्हणाले.

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड