आनंद बोरा यांना कांदळवन प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय छायाचित्र पुरस्कार

महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान (कांदळवन प्रतिष्ठान) यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांना मानव आणि पक्षी या श्रेणीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित

नाशिक : महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान (कांदळवन प्रतिष्ठान) यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांना मानव आणि पक्षी या श्रेणीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रा. बोरा यांच्या महाराष्ट्रातील पक्षीतीर्थ समजल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील ‘वारकरी पक्षी आणि लाकडे गोळा करणाऱ्या महिला’ या छायाचित्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले. पारितोषिकाचे स्वरूप सात हजार ५०० रुपये,सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे.https://36ccc3d3ac8fffa697bb5f1478efec94.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाच ते १२ नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यावर्षी कांदळवन प्रतिष्ठान तर्फे पक्षी सप्ताह निमित्ताने  राज्यस्तरीय पक्षी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील किनारे आणि पाणथळ पक्षी असे स्पर्धेसाठीचे विषय होते. पोट्र्रेट, वर्तन, मानव व पक्षी  आणि निसर्गातील सौंदर्य अशा चार गटात स्पर्धा झाली. 

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

छायाचित्र स्पर्धेत मानव आणि पक्षी गटात प्रथम पारितोषिक प्रा.आनंद बोरा, निसर्गातील सौंदर्य श्रेणीत डॉ. पराग नलावडे, पोट्र्रेट  श्रेणीत  निखील जांभळे, वर्तन श्रेणीत प्रथम पारितोषिक संतोष गुळवणी यांना तर द्वितीय पारितोषिक  प्रणव गोखले यांना देण्यात आले. निवृत्त मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर, अपर मुख्य वन संरक्षक वीरेंद्र तिवारी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनचे अधिकारी हृषिकेश राणे यांनी आभार मानले.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका