आनंद महिंद्रांपाठोपाठ भारतीय लष्कराकडूनही सुभेदार नीजरला मिळणार मोठं सप्राइज?

नीरजच्या कामगिरीचा देशातील प्रत्येकाला अभिमान असून तो एका खऱ्या सैनिकासारखा लढल्याचं संरक्षण दलांनी म्हटलं आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीसाठी भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनी एक्सयूव्ही ७०० ही गाडी देणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता नीरजला भारतीय लष्कराकडून एक खास भेट मिळण्याची शक्यता आहे. मागील १३ वर्षांपासून देश वाटत पाहत असणारं ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक पटकावत इतिहास रचणाऱ्या नीरजला आता भारतीय लष्कारकडून पदोन्नती म्हणजेच प्रमोशनचं गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. नीरज सध्या भारतीय लष्करामध्ये सुभेदार म्हणून कार्यरत असून तो राजपूताना रायफल्सच्या तुकडीत आहेत. यापूर्वी लष्कराकडून त्याला भालाफेकमधील कामगिरीसाठी विशेष सेवा मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे.

हरयाणामधील पानिपत येथील खांदरा गावामधील एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या नीरजने शनिवारी ऑलिम्पिकमधील भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. ट्रॅक आणि फिल्ड गेम्समधील भारताचं हे मागील १०० वर्षांमधील पहिलं पदक ठरलं आहे.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

नीरजला बढती दिली जाणार असल्याचं लष्कराच्या सुत्रांनी म्हटलं आहे. नीरजची ऑलिम्पिकमधील कामगिरी पाहून नियमांनुसार त्याला प्रमोशन मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण दलांनी शनिवारी निरजने पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. नीरजच्या कामगिरीचा देशातील प्रत्येकाला अभिमान असून तो एका खऱ्या सैनिकासारखा लढल्याचं संरक्षण दलांनी म्हटलं होतं. नीरजला १५ मे २०१६ पासून ४ राजपूताना रायफल्सच्या तुकडीमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”

लष्करामध्ये भरती झाल्यानंतर त्याला ‘मिशन ऑलिम्पिक विंग’साठी तसेच लष्कराच्या पुण्यातील इन्स्टीट्यूसाठी निवडण्यात आलं. भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या ‘मिशन ऑलिम्पिक विंग’अंतर्गत वेगवेगळ्या ११ खेळांमध्ये तरुण खेळाडूंना संधी देणे आणि त्यांना प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीतील स्पर्धांमध्ये पाठवण्याची मोहीम राबवली आहे, असं लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. नीरजच्या यशामुळे या ‘मिशन ऑलिम्पिक विंग’अंतर्गत खेळाडूंवर घेण्यात आलेले कष्ट आणि मेहनत सार्थकी लागल्याची भावना लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.

“‘मिशन ऑलिम्पिक विंग’ने ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन रौप्यपदकं जिंकून दिली आहेत. सुभेदार चोप्राच्या पदकांनी या मोहीमेचं महत्व अधिक अधोरेखित झालं असून येथे घेण्यात येणारे कष्ट आणि मेहनतीची यावरुन कल्पना सर्वांना आलीय,” असं लष्कराने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. सुभेदार चोप्रा यांना २०१८ साली अर्जून पुरस्कार आणि २०२० साली खेळांमधील विशेष कामगिरीसाठी विशिष्ट सेवा मेडलनं सन्मानित करण्यात आल्याचाही उल्लेख पत्रकामध्ये आहे.

हे वाचले का?  Vinesh Phogat Hearing in CAS: विनेश फोगटला रौप्य पदक देता येणं शक्य नाही? IOC प्रमुखांचा स्पष्ट नकार, म्हणाले…

नीरजचा जन्म २४ डिसेंबर १९९७ साली झाला आहे. त्याचे वडील सतीश कुमार हे शेतकरी तर आई सरोज देवी या गृहिणी आहेत.