आपापसातील मतभेद विसरून कामाला लागा

मागील महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये इतर पक्षातील नगरसेवकांना मोठय़ा प्रमाणात प्रवेश दिला गेला. त्यावरून पक्षात नवे-जुने असे गट पडले. स्थानिक पातळीवरील गटबाजी बहुदा गडकरी यांनी हेरली.

नितीन गडकरी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष केवळ मलई खाण्याच्या उद्देशाने एकत्र आले आहेत. परस्परविरोधी विचारधारेचे शिवसेना, काँग्रेस हे पक्ष कधी एकत्र येतील असा विचार कुणी केला नव्हता. भाजपसारखे संघटन कुठल्याही अन्य पक्षांकडे नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आपसातील  मतभेद विसरून केंद्र सरकार व महापालिकेच्या माध्यमातून केलेली कामे जनतेसमोर मांडावीत, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.https://ccfc25fc0960c36538eef68215e73589.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या गडकरी यांनी सोमवारी रात्री शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी गडकरी यांनी उपरोक्त सल्ला दिला.

मागील महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये इतर पक्षातील नगरसेवकांना मोठय़ा प्रमाणात प्रवेश दिला गेला. त्यावरून पक्षात नवे-जुने असे गट पडले. स्थानिक पातळीवरील गटबाजी बहुदा गडकरी यांनी हेरली.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

त्याचा थेट संदर्भ न देता अतिशय कठीण काळात काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांच्याच योगदानावर आज भाजप उभा असल्याचे सांगितले. लोकसभेत पक्षाचे केवळ दोन खासदार होते. तेव्हा इतर पक्षीयांकडून टिंगलटवाळी केली जात असे. तरीदेखील भाजपचे जुने कार्यकर्ते काम करीत राहिले.

स्थानिक पातळीवरील अशा अनेकांचा त्यांनी नामोल्लेख देखील केला. पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांचे योगदान स्मरणात ठेवावे, असेही सूचित केले.

समृध्दी महामार्गाशी जोडणारा मार्ग सहापदरी करण्याची मागणी

नाशिक जिल्ह्याच्या फलोत्पादन, पर्यटन, औद्योगिक विकासाच्या दृष्टीने समृध्दी महामार्गाशी जोडणारा मार्ग दोनऐवजी सहा पदरी करावा, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे ते वडपे मार्ग सहापदरी करावा, टोल नाक्यांवर आयओटी सेन्सर बसवावेत, आदी मागण्या ‘मी नाशिककर’ संघटनेकडून करण्यात आल्या. विविध संघटनांनी गडकरी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे साकडे घातले. वाडिवऱ्हेहून समृध्दी महामार्गाशी जोडणारा २५ किलोमीटरचा मार्ग दोन मार्गिका  ऐवजी सहा पदरी केल्यास मुंबईला जाणारा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. क्षमतेहून अधिक वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांची बिकट अवस्था होत आहे. अशी वाहने ओळखण्यासाठी टोल नाक्यांवर आयओटी सेन्सर बसविण्याची गरज मी नाशिककर संस्थेकडून मांडली गेली. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रचंड वाढत आहे. त्यामुळे गोंदे ते वडपे या टप्प्याचे सहापदरीकरण करावे, याकडे लक्ष वेधण्यात आले. सुमारे अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रश्नोत्तराचा तास रंगला. यावेळी खड्डेमय रस्ते, महामार्गाचे विस्तारीकरण, समृध्दी महामार्गाशी निगडीत भूसंपादन आदी विषयांशीच अनेक प्रश्न मांडले गेले. यामुळे खुद्द गडकरी यांनीच कार्यकर्त्यांना इतरही विषयावरील प्रश्न विचारावेत, अशी सूचना केली. खड्डय़ांवरील प्रश्नांवर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे १५ दिवसांच्या आत बुजविण्याचे निर्देश त्यांनी दिले. बहुतांश प्रश्न केवळ रस्ते वाहतूक मंत्रालयाशी संबंधित असल्याने खुद्द गडकरी यांनी केवळ रस्ते नव्हे तर, इतरही विषयांवर प्रश्न विचारण्यास सांगितल्याचे बैठकीत सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मंगळवारी दिवसभर गडकरी हे त्र्यंबक नगरीत होते. खासगी कार्यक्रम असल्याचे सांगून भाजप पदाधिकाऱ्यांनी त्याबद्दल मौन बाळगले होते.

हे वाचले का?  नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित