आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते; त्यांच्याच हातात फुटला; संजय राऊतांचा भाजपावर टीकेचा बाण

भाजपाच्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आल्याने राज्यातील राजकारण राजकीय वाद उभा राहिला आहे. यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला सुनावलं…

इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा ठराव सोमवारी विधानसभेत मांडण्यात आला. या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. या कारवाईविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. तर या कारवाईवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीकेचे बाण डागले आहेत.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “बारा आमदारांचं वर्तन तुम्ही बघितलं असेल, ते आमदार कशा प्रकारे वागले. अध्यक्षांसमोरील वेलमध्ये गेले, हे आम्ही पाहतोय; आम्ही त्या सभागृहात नव्हतो. तालिका समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव हे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. यांची अशी भूमिका आहे की, त्यांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. विधानसभेच्या इतिहासात अशा प्रकारचं वर्तन झालं नव्हतं असं ते म्हणाले. कालच सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तेच सांगितलं की, आमदार-खासदारांचं सभागृहातील अशा प्रकारचं वर्तन सहन करता कामा नये.

हे वाचले का?  Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

“आता बारा आमदारांचं निलंबन झालेलं आहे. हा एक शिस्तीचा भाग आहे. शिस्ती मोडली जाते, अशाने सभागृहात दंगली होतील. पाकिस्तानच्या संसदेत आपण पाहिलं. काही वेळेला बिहार, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आम्ही पाहिलं आहे. संपूर्ण दंगलीसारखं चित्र निर्माण झालं होतं. महाराष्ट्रात अशा परंपरा पडू नये, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी कठोर निर्णय घेतला असेल’, असं राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

हे वाचले का?  “विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

सभागृहात बोलू दिलं जात नव्हतं, असं भाजपाचं म्हणणं आहे. त्यावर राऊत म्हणाले, “मूळात बोलू दिलं जात नाही, असं मला वाटत नाही. सभागृह विचार मांडण्यासाठीच असतं. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण कोकणात एक म्हण आहे, ‘केले तुका, झाले माका’; बॉम्ब त्यांच्या हातातच होता. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण एक चूक किती महागात पडू शकते. बेशिस्त वर्तन महाराष्ट्राच्या विधानसभेत चालत नाही,” असा टोला राऊत यांनी भाजपाला लगावला.

हे वाचले का?  Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…