आरोग्य विद्यापीठाच्या लेखी परीक्षा सुरळीत

करोना काळात परीक्षा केंद्रांवर सीसी टीव्ही यंत्रणेमार्फत लक्ष ठेवले जात आहे.

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी २०२१ सत्राच्या सर्व पदव्युत्तर विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा सुरळीत सुरू आहेत. राज्यातील ५७ परीक्षा केंद्रांवर सुरू असलेल्या या परीक्षेत ४२०० हून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. करोना काळात परीक्षा केंद्रांवर सीसी टीव्ही यंत्रणेमार्फत लक्ष ठेवले जात आहे.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

उन्हाळी सत्रातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, परिचर्या, भौतिकोपचारशास्त्र, व्यवसायोपचारशास्त्र, भाषा श्रवणदोष विज्ञानशास्त्र आदी अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षेस नुकताच प्रारंभ झाला आहे. या परीक्षांसाठी एकूण ३८८८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. याशिवाय एम.बी.बी.एस. अंतिम वर्ष आणि प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. जुन्या अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांचा यात समावेश आहे. जुन्या अभ्यासक्रमातील परीक्षेसाठी ३७४ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. राज्यातील विविध ५७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रत्येक पेपरनंतर एक दिवसाचा खंड देण्यात आला असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले. करोनाच्या नियमांचे पालन करण्याबरोबर परीक्षा केंद्र निर्जंतुकीकरण करण्याबाबत महाविद्यालयांना सूचना करण्यात आली आहे.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर