आर्थिक मदत सुरू ठेवण्याची अर्थमंत्र्यांची ग्वाही

आता अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू झाल्याने करोना संकटकाळात विविध घटकांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले.

उत्पादन क्षेत्रात वृद्धीची चिन्हे असून ग्रामीण अर्थव्यवस्थेतही धुगधुगी निर्माण झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ऑगस्टमधील जीएसटी संकलन  समाधानकारक आहे, ई-वे बिल आकारणीत ऑगस्टमध्ये वाढ झाली असून पोलाद निर्यातीतही  वृद्धी होत आहे, असे सीतारामन यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला शनिवारी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, ‘‘टाळेबंदीच्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने कमी झाली नाहीत, तर त्यांचे स्वरूप बदलले..आणि अर्थमंत्रालय आता या परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देत मार्ग काढत आहे.’’

हे वाचले का?  Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा

करोना साथीमुळे गावाला गेलेले वस्त्रनिर्मितीसारख्या उद्योगातील परप्रांतीय कामगार पुन्हा कामावर येत आहेत. काही क्षेत्रांतील निर्यातही हळूहळू वेग घेत आहे. उदा. पोलादाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. सध्याच्या देशांतर्गत मागणीपेक्षा परदेशातून मागणी वाढली असल्याचेही सीतारामन यांनी नमूद केले.

सीतारामन यांनी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेने वेग घेतला असून तीत जोमदार वाढ झाल्याचे सांगितले.

‘‘केवळ कृषी क्षेत्रातच नव्हे, तर अकृषक क्षेत्रांतील अर्थव्यवहारातही मोठी वाढ झाल्याचे सीतारामन म्हणाल्या.

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

मोठय़ा क्षेत्रांतील उत्पादन घसरणीमुळे अर्थव्यस्थेचे झालेले नुकसान गेल्या तीन महिन्यांत भरून निघाल्याचे  आकडेवारीवरून स्पष्ट होते. जीएसटीच्या महसुलात वाढ झाली आहे. यंदाचे जीएसटी संकलन गेल्यावर्षीच्या ऑगस्टमधील ८८ टक्के संकलनाच्या तुलनेत समाधानकारक आहे. ई वे बिल आकारणी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ९७.२ टक्के होती. त्या तुलनेत यंदाही वाढ झाली आहे. आयएचएस मार्किट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) जुलैमध्ये ४६ होता. तो ऑगस्टमध्ये सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर- ५२ वर पोहोचला.