विज्ञान भवनात झालेल्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
नाशिक : विविधतेने नटलेल्या शहराचे धार्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील वैशिष्टय़े अधोरेखित करणाऱ्या ‘लोकसत्ता’ निर्मित ‘गोदागौरव’ या नाशिक कॉफी टेबल बुकचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, माजी मंत्री छगन भुजबळ, आ. देवयानी फरांदे, दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे दीपक चंदे, लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, कवयित्री नीरजा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रस्तुत ‘गोदागौरव’ या कॉफी टेबल पुस्तकाचे सहप्रायोजक मेट- भुजबळ नॉलेज सिटी हे आहेत. तिडके कॉलनीतील एसएसके सॉलिटेअर हॉटेलच्या सभागृहात शुक्रवारी सायंकाळी निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ज्येष्ठ कवयित्री नीरजा व लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी माणसाचे विविधांगी पैलू उलगडणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक केले. नाशिकच्या विकासाशी संबंधित सर्व वैशिष्टय़ांचा कॉफीटेबल पुस्तकात समावेश आहे. प्रकाशन सोहळय़ास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
Loaded: 1.20%Fullscreen
प्रायोजक : दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रस्तुत गोदागौरव या कॉफीटेबल पुस्तकाचे सहप्रायोजक मेट-भुजबळ नॉलेज सिटी आहेत.