इंदुरी दहीवडा, बदामाचा शिरा अन आलुकोहळ्याचा साग! साहित्य संमेलनातील भोजनबेत ठरलं, कधी पोहोचताय वर्धेला?

जिव्हेच्या विविध कडांचा रसास्वाद पूर्ण करणारा हा बेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दहा विविध प्रकारचे मिष्ठान्न तृप्तीची ढेकर देण्यास पुरेसे ठरणारे आहेत.

संमेलनातील वाङ्मयीन चर्चा किती खुमासदार, रंगतदार होईल हे पुढचे पुढे ठरेलच. मात्र, संमेलनातील तीनही दिवसांचा भोजनबेत मात्र आताच ठरला आहे. जिव्हेच्या विविध कडांचा रसास्वाद पूर्ण करणारा हा बेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दहा विविध प्रकारचे मिष्ठान्न तृप्तीची ढेकर देण्यास पुरेसे ठरणारे आहेत.

उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी तीन फेब्रुवारीला सकाळी नाष्ट्यात उत्तपम, गार्डन इडली, मैसूर वडा, बनारसी चुरामटर व दालबदाम शिरा राहणार आहे. दुपारच्या जेवणात पनीर अकबरी, वेज कोल्हापुरी, डाळफ्राय, मिस्सीपुरी, मिस्सीपराठा, स्ट्रॉबेरी रसमलाई, मावावाटी, दहीवडा व कॉर्नकटलेट आहे. रात्रीच्या जेवणात लच्छेदार रबडी, केसरकाॅईन जलेबी व सीताफळ छेनापाईज हे तीन मिष्ठान्न, तसेच अन्य पदार्थांत इंदुरी दहीवडा, मिक्स पकोडे, कढाई पनीर, मेथी मटर मलाई व हैदराबादी वांगे राहणार. शिवाय साेबतीला झुनका, बिस्कीट भाकर, कढी, दाळ मखनी, गट्टे पुलाव, वाफवलेला भात, मिनी तंदुरी, फुलका, मिस्सीपुरी व स्टिक मलाई कुल्फी आहे.

हे वाचले का?  निवडणुकीसाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

दुसऱ्या दिवशी चार फेब्रुवारीला सकाळी नाष्ट्यात इंदोरी पोहा, चना मोट, तिखट चिवडा, मिनी आलुकोफ्ता व वेजी सेन्डविच आहे. या दिवशी शनिवार म्हणून उपवास असणाऱ्यांसाठी भगरपुलाव, दही, साबुदाणा वडा, फराळी चिवडा व विलायची केळी मिळणार. दुपारच्या जेवणात फ्रुट श्रीखंड, गुलाबजामून, मिश्रदालवडा, मटर कचोरी, मटर पनीर, सावजी कोफ्ता, दाळभाजी, दाळतडका, दमतवा सावजी व फुलके असा बेत आहे.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

उपवासास राजगिरा पुरी, आलुशिरा, आलुसाग, फ्रेश फ्रुट, साबुदाणा खिचडी ठेवण्यात आली आहे. रात्रीच्या जेवणात पुरणपोळी, केसर रसगुल्ला, वेजकटलेट, जोधपुरीवडा, पनीर बटर मसाला, मलाईकोफ्ता, सेवटमाटर, दालजीरा, दालतडका, व्हेज बिर्यानी, फुलका, मिनीतंदुरी, बटर पोळी असे ताट सजणार.