“इतकी भीती का वाटावी?” राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री शिंदेंना थेट सवाल; म्हणाले, “उद्धव ठाकरे संवाद साधत नाही म्हणत शिंदे गट…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट उल्लेख करताना त्यांना पोस्टमध्ये टॅग करत हा प्रश्न विचारण्यात आला आहे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेच्या प्रश्नांची भीती वाटते का असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला आहे. नवी दिल्लीमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेच्या फेसबुक लाइव्हदरम्यान शिंदेंच्या फेसबुक पेजवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आलं होतं. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सरकारवर टीका केली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदेंवर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधत नसल्याची टीका करत महाविकास आघाडीतून बाहेर पडणाऱ्या शिंदे गटानेच आता संवाद होऊ नये अशी तरदूत करत कमेंट सेक्शन बंद केल्याचा टोलाही राष्ट्रवादीने लगावला आहे.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरील फोटो आणि व्हिडीओवर आता युझर्सला त्यांना फॉलो करणाऱ्यांना कमेंट करता येत नाही. मुख्यमंत्री शिंदेंच्या पेजवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आलेलं आहे. सर्वात आधी ही बाब सात ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री दिल्लीमधून पत्रकार परिषद घेत असताना समोर आली. सायंकाळी झालेल्या या पत्रकार परिषदेच्या फेसबुक लाइव्हदरम्यान शिंदेंच्या पेजवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आल्याचं दिसून आलं.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका

त्यानंतर शिंदेंच्या पेजवरुन पोस्ट होणाऱ्या कोणत्याही पोस्टवर लोकांना कमेंट करता येत नसल्याचं दिसून आलं. यामध्ये अगदी जयंती किंवा विशेष दिनासंदर्भातील पोस्ट असतील, लाइव्ह व्हिडीओ असतील किंवा इतर कोणत्याही पोस्टवर फॉलोअर्सला केवळ रिअॅक्ट आणि शेअर हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. काल हिंगोलीमध्ये झालेल्या सभेच्या लाइव्ह वेबकास्टदरम्यानही कमेंट सेक्शन बंद होतं. एकनाथ शिंदे यांच्या पेजवरुन कमेंट सेक्शन बंद करण्यात आल्याचा मेसेज पोस्टखाली दाखवला जात आहे.

हे वाचले का?  मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह