इतर देशांच्या तुलनेत भारतानं ओमायक्रॉनची लाट चांगली हाताळली; आकडेवारीतून माहिती समोर

इतर देशांच्या तुलनेत भारताने ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे आलेली करोनाची लाट योग्यरित्या हाताळल्याचं आकडेवारीतून समोर आलंय.

चीन, दक्षिण कोरिया आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये करोनाने हाहाकार माजवला आहे. या देशांमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे या देशांमधील रुग्णसंख्या वाढल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत भारताने ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे आलेली करोनाची लाट योग्यरित्या हाताळल्याचं आकडेवारीतून समोर आलंय.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

सरकारने सांगितले की, मोठ्या प्रमाणात लसीकरण कव्हरेज आणि सार्वजनिक आरोग्य प्रणालीत करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यामुळे देशात ओमायक्रॉन सर्जचे चांगले व्यवस्थापन झाले. ओमायक्रॉनमुळे आलेल्या तिसऱ्या लाटेत करोना महामारीच्या भारताच्या व्यवस्थापनाने प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, स्वावलंबन, तंत्रज्ञानावर आधारित नवीन कल्पना आणि  प्रयत्नांची ताकद जगाला दाखवून दिली आहे, असे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी सांगितले. नीती आयोग आणि २०० हून अधिक स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाज संघटनांनी आयोजित केलेल्या ‘इंडियाज पब्लिक हेल्थ रिस्पॉन्स टू मॅनेज कोविड-१९’ या वेबिनारमध्ये ते बोलत होते

हे वाचले का?  ५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प

अनेक देशांमध्ये अजूनही प्रकरणांमध्ये वाढ होत असताना भारतात मात्र, खूप कमी संसर्ग पाहायला मिळाला. डेल्टा लाटेच्या काळात ६८ दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत केवळ २४ दिवसांत प्रकरणांमध्ये खूप वेगाने घट झाली. भारतात १९-२५ जानेवारी दरम्यान कोविडची सरासरी दैनंदिन प्रकरणे ३.११ लाखांवरून ९-१५ मार्च दरम्यान ३५३६ प्रकरणांवर आली. तर, देशभरात आतापर्यंत करोनाचे १८० कोटींहून अधिक डोस दिले गेले आहेत, असं मांडविया यांनी सांगितलं.

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक