इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

हेझबोलाने प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलमधील तिसरे सर्वात मोठे शहर हैफा येथे हल्ला केला. या हल्ल्यात १० लोक जखमी झाले.

पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि आजूबाजूचे देश अशांत आहेत. युद्ध छेडल्याच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला इस्रायलने लेबनॉनच्या बेरूतमध्ये हवाई हल्ला केला. या हल्ल्यात तीनजण जखमी झाले. या हल्ल्याचा प्रतिहल्ला म्हणून हेझबोलानेही सोमवारी इस्रायलच्या हैफावर हल्ला चढवला. या प्रतिहल्ल्यातही १० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हिंदूस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गाझा, इराण आणि लेबनॉन अशा तीन स्तरांवर इस्रायलकडून हवाई हल्ले केले जात आहेत. सप्टेंबर महिन्यातं इस्रायलने हवाई हल्ल्यात वाढ केली. रविवारी पुन्हा इस्रायलने लेबनॉनवर हल्ला चढवला. या प्रत्युत्तरात लेबनॉनस्थित दहशतवादी संघटना हेझबोल्लानेही इस्रायलवर प्रतिहल्ला केला. एका निवेदनात हेझबोलाने म्हटलंय की, फादी १ क्षेपणास्त्रांच्या साल्व्होने हैफाच्या दक्षिणेकडील लष्करी तळाला लक्ष्य केलं. इस्रायली पोलिसांच्या म्हणण्यांनुसार,काही लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे आणि इमारती वा मालत्तेचे नुकसान झाले आहे.

हे वाचले का?  PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी रविवारी विजय मिळवण्याची शपथ घेतली. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने हल्ला केल्यानंतर वर्षभरात इस्रायलच्या सैन्याने “पूर्णपणे वास्तव बदलले” असे बिन्यामिन नेत्यानाहू यांनी सांगितलं. त्यांनी इस्रायली सैन्याला आश्वासन दिले की ते “जिंकतील”.

इस्रायलचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्झी हालेवी म्हणाले की, एका वर्षानंतर त्यांनी “हमासच्या लष्करी शाखेचा पराभव केला आहे”. गेल्या आठवड्यात इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलने इराणवर हल्ला करण्याची शपथ घेतली आहे. दरम्यान, आज इस्रायलमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

अमेरिकेची मदत मिळणार?

इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे अमेरिकेकडून इस्रायलला अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडू इस्रायलला महत्त्वपूर्ण लष्करी आणि राजनैतिक समर्थन मिळते. सीरिया, इराक आणि येमेनमधील इराण-मित्रवादी दहशतवादी गट इस्रायलवर लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमध्ये सामील झाले आहेत, असे एपीने वृत्त दिले आहे.