उत्तर, पूर्व भारतात दाट धुक्याने रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम

देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पडलेल्या दाट धुक्यामुळे गुरुवारी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पीटीआय, नवी दिल्ली

देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पडलेल्या दाट धुक्यामुळे गुरुवारी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले, धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या २४ रेल्वेगाडय़ा उशिराने धावत आहेत.हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, त्रिपुराच्या विविध भागांत खूप दाट धुके होते. तर पूर्व उत्तर प्रदेश, जम्मू, हरियाणा, दिल्ली, बिहार, आसाम आणि पूर्व मध्य प्रदेशात दाट धुके होते. उत्तर राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागात मध्यम प्रमाणात धुके होते.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा

पंजाबमधील भटिंडा आणि उत्तर प्रदेशातील आग्रा येथे दृश्यमानता शून्य मीटपर्यंत घटली होती. त्रिपुरातील आगरतळा येथे ती २५ मीटपर्यंतच होती जम्मू, हरियाणातील हिस्सार, उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि लखनौ, मध्य प्रदेशातील सागर आणि सतना, बिहारमधील पूर्णिया आणि आसाममधील तेजपूर येथे दृश्यमानता स्तर ५० मीटपर्यंत होता.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील पालम वेधशाळेने सकाळी साडेपाचला १०० मीटपर्यंतची दृश्यमानता पातळी नोंदवली. तथापि पृष्ठीय वाऱ्यांमुळे त्यात सुधारणा झाली आणि सकाळी सातच्या दरम्यान दृश्यमानता पातळी ५०० मीटपर्यंत पोहोचली. राजस्थानमधील गंगानगर आणि मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये २०० मीटरची दृश्यमानता स्तर नोंदवण्यात आला.

हे वाचले का?  Lal Krishna Advani : लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?

सूर्यप्रकाशात अडथळा

’२७ डिसेंबरपासून मैदानी भागात काही उंचीवर पसरलेला धुक्याचा थर सूर्यप्रकाश रोखत आहे. म्हणून काही ठिकाणी निरभ्र आकाश असलेल्या डोंगराळ भागांपेक्षा कमाल तापमान कमी होते.

’धुक्याच्या पातळ थरात सूर्यप्रकाश पडू लागल्याने बुधवारी उत्तरेकडील मैदानी भागात थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला. परंतु थंड बोचऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली.

’३०-३१ डिसेंबरपासून उत्तर भारतातील अनेक भागांत ‘शीत दिवस’ आणि ‘अतिशीत दिवस’ अशी स्थिती आहे, असे हवामान विभागाचे प्रादेशिक केंद्रप्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले.

देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पडलेल्या दाट धुक्यामुळे गुरुवारी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मैदानी भागात पसरलेला धुक्याचा थर सूर्यप्रकाश रोखत आहे.