उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस असलेले खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या वारसांना जमीन महसूल करात यापूर्वी देण्यात आलेली सूट तहहयात सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस असलेले खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या वारसांना जमीन महसूल करात यापूर्वी देण्यात आलेली सूट तहहयात सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे राज्याच्या इतिहासातील अनन्यसाधारण महत्त्व विचारात घेऊन भोसले कुटुंबीयांची उपजीविका त्यांच्या दर्जानुसार होण्यासाठी घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना शासनाने १९५३ पासून महसुलात सूट दिलेली आहे. ही सवलत सध्याही सुरू असून, ती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हयातीनंतर वंशपरंपरेने त्यांच्या रक्ताच्या वारसांना तहहयात सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हे वाचले का?  Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने काढलेल्या या शासन निर्णयात म्हटले आहे, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे महत्त्व लक्षात घेऊन घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तासंदर्भात वेळोवेळी शासन आदेश काढून सूट दिलेली आहे.

१९५३ मध्ये याबाबत प्रथम निर्णय घेण्यात आला होता. राज्य शासनाच्या वतीने कॅप्टन श्रीमंत शाहू प्रतापसिंह भोसले यांना अशी सूट दिली होती. त्यांच्या निधनानंतर मुलगा श्रीमंत प्रतापसिंह महाराज शाहू महाराज भोसले यांना १९५७ च्या शासन निर्णयानुसार सूट देण्यात आली. त्यानंतर १९८० च्या शासन निर्णयानुसार ही सूट उदयनराजे भोसले यांना दिली होती. आता ९ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार खासदार उदयनराजे भोसले यांच्या हयातीनंतर वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तहहयात सूट सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे वाचले का?  Sanjay Raut: “आतापर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते पण आता…” एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर संजय राऊतांचा टोला

लोकसत्ता प्रतिनिधी