“एका जरी अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला तर…,” डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला इशारा

अमेरिकन दुतावासावर रॉकेट हल्ला

इराकची राजधानी बगदाद येथे अमेरिकन दुतावासावर रॉकेट हल्ला झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या रॉकेट हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरवलं आहे. यासोबतच या हल्ल्यात एकाही अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला तर सैन्य कारवाई करण्याचा सूचक इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन दुतावासावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटचा फोटो ट्विट करत हे इराणमधून आल्याचा उल्लेख केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “बगदादामधील आमच्या दुतावासावर रॉकेट हल्ला करण्यात आला. तीन रॉकेट यावेळी अपयशी ठरले. हे रॉकेट कुठून आले होते याचा अंदाज लावा – इराण…इराणमध्ये अमेरिकन नागरिकांवर अजून हल्ले होणार असल्याची चर्चा आम्ही ऐकत आहोत. इराणला माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे. एका अमेरिकन नागरिकाचा जरी मृत्यू झाला तर यासाठी मी इराणला जबाबदार धरणार आहे. मी हे अत्यंत गांभीर्यांनं घेत

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

इराकच्या लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ग्रीन झोन परिसरातील अमेरिकन दुतावासावर रॉकेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. जवळपास आठ रॉकेट दुतावासावर सोडण्यात आल्याचं लष्कराने सांगितलं आहे. या हल्ल्यात इराकचे अनेक सैनिक जखमी झाले असून कार आणि इमारतींचं नुकसान झालं आहे.

इराणकडून इराकमध्ये ३ जानेवारीला जनरल कासीम सुलेमानीच्या हत्येची आठवण करुन देत हल्ला केला जाऊ शकतो अशी व्हाईट हाऊसला भीती आहे. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात जनरल सुलेमानी ठार झाला होता.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार