ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरवर भारताची भिस्त

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेलया ईलाव्हेनिल व्हॅलारिव्हानने भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

भारतीय नेमबाजी संघाची घोषणा; महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत आणि राही सरनोबतचा समावेश

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी रविवारी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून, तीन स्पर्धा प्रकारांमध्ये देशाची भिस्त युवा नेमबाज मनू भाकरवर असणार आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत आणि राही सरनोबत यांनीही या संघात स्थान मिळवले आहे.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेलया ईलाव्हेनिल व्हॅलारिव्हानने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात चिंकी यादवने ऑलिम्पिकमधील स्थानाची निश्चिती केली होती. परंतु दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या चिंकी मुख्य संघात स्थान मिळवता आलेले नाही. पण अंजूम मुदगिलला ते स्थान देण्यात आले. या प्रकारात दुसऱ्या स्थानावर माजी विश्वविजेत्या तेजस्विनीची निवड करण्यात आली आहे. १० मीटर एअर रायफल महिला गटात ईलाव्हेनिलने ऑलिम्पिक स्थाननिश्चिती केली नव्हती, परंतु ऑलिम्पिक पात्रता स्पर्धामधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर तिची निवड करण्यात आली आहे.

हे वाचले का?  Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक

करोना साथीमुळे भारतीय रायफल संघटनेने प्रत्येक स्पर्धा प्रकारात दोन राखीव खेळाडूंची निवड केली आहे. वैयक्तिक विभागात महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात मनूसह अनुभवी राहीवर भारताची मदार असेल, तर १० मीटर पिस्तूल प्रकारात मनूसह यशस्विनी सिंग देस्वालचा समावेश करण्यात आला आहे. अपूर्वी चंडेला फक्त महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात खेळणार आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

भारतीय संघ

’  १० मीटर एअर रायफल पुरुष : दिव्यांश सिंग पनवार, दीपक कुमार

’  ५० मीटर रायफल थ्री पोझिशन पुरुष : संजीव रजपूत, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर

’  १० मीटर एअर पिस्तूल पुरुष : सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा

’  १० मीटर एअर रायफल महिला : अपूर्वी चंडेला, ईलाव्हेनिल व्हॅलारिव्हान

’  ५० मीटर रायफल थ्री पोझिशन महिला : अंजूम मुदगिल, तेजस्विनी सावंत

’  १० मीटर एअर पिस्तूल महिला : मनू भाकर, यशस्विनी सिंग देस्वाल

’  २५ मीटर पिस्तूल महिला : राही सरनोबत, मनू भाकर

’  स्कीट पुरुष : अंगदवीर सिंग बाजवा, मैराज अहमद खान

’  १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक : दिव्यांश सिंग पनवार, ईलाव्हेनिल व्हॅलारिव्हान, दीपक कुमार, अंजूम मुदगिल

हे वाचले का?  ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

’  १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक : सौरभ चौधरी, मनू भाकर, अभिषेक वर्मा, यशस्विनी सिंग देस्वाल