करोनानंतर दिल्लीकरांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ची भीती!

ब्लॅक फंगसचं सावट

दिल्लीत करोनाचा कहर असताना आता ‘ब्लॅक फंगस’च सावट घोंघावू लागलं आहे. करोनामुळे ‘म्यूकोरमायसिस’ प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या आजारामुळे डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे. म्यूकोरमायसिस एक करोनामुळे होणारं फंगल संक्रमण आहे.

‘आम्हाला करोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसात म्यूकोरमायसिस पीडित सहा रुग्ण भरती झाले आहेत. गेल्या वर्षी या संक्रमणामुळे मृत्यू दरही अधिक होता. यामुळे कित्येक लोकांना अंधत्व आलं होतं. तसेच नाक आणी गळ्याचं हाड गळून गेलं होतं.’ असं गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉक्टर मनिष मुंजाल यांनी सांगितलं आहे.

हे वाचले का?  Tirupati Laddu : चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत भाविकाचा गंभीर दावा, VIDEO व्हायरल

‘मधुमेह असलेल्या करोना रुग्णांवर स्टेरॉईडचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण त्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता आहे’, असं ईएनटी विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितलं. ब्लॅक फंगसची लक्षण करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. खासकरून मधुमेह, किडनी, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांनी पीडित लोकांमध्ये ही समस्या अधिक आहे.

भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्या रोज नवे उच्चांक गाठत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही काळजीचा विषय ठरत असून सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?