कल्याणच्या संजल गावंडेची भरारी!; अमेरिकेच्या स्पेस टुरिझम मध्येही फडकला मराठी झेंडा

जेफ बेझोस यांच्या ‘न्यु शेफर्ड’ या अंतराळ यानाचे आरेखन करणाऱ्या दहा जणांच्या टीममध्ये संजलचा समावेश

अमेरिकेतील ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीने अंतराळ सफारीची घोषणा केली आहे.

मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावी अशी एक बातमी समोर आली आहे. कल्याण पूर्व मधील संजल गावंडे या तरूणीने अमेरिकेच्या स्पेस टुरिझम मध्ये मराठी झेंडा फडकवला आहे. अमेरिकेतील ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीने अंतराळ सफारीची घोषणा केली असून, २० जुलै रोजी कंपनीमार्फत न्यु शेफर्ड हे खासगी यान अॅमेझॉनचे संस्थापक व ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस याच्यासह काही निवडक जणांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. तर, हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टीममध्ये कल्याणच्या संजल गावंडे हिचा समावेश आहे.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरातील रहिवासी असलेल्या संजलची आई सुरेखा गावंडे एमटीएनएलमधील व वडील अशोक गावंडे हे केडीएमसीतील निवृत्त कर्मचारी आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध परीक्षा देत संजलने ही भरारी घेतली आहे. मुंबई विद्यापीठातून मॅकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले व त्यासोबतच जीआरई, टोफेलसारख्या इंजिनिअरिंग विषयातील परीक्षांमध्येही यश मिळत, तिने अमेरिकेतील मिशगन टेक युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवला. तिथे देखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत मॅकॅनिकलमध्ये मास्टर पदवी मिळवली. यानंतर २०१३ मध्ये तिने विस्कॉनसिनमधील फॉन्ड्युलेकच्या मर्क्युरी मरीन कंपनीत जॉब सुरू केला.

हे वाचले का?  राज्य मंडळाकडून बारावी, दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर… लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा कधी सुरू होणार?

परंतु, अवकाशाला गवसणी घालण्याची तिची ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती, तिला भरारी घ्यायची होती. त्यामुळे तिने सुट्टीच्या दिवशी विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली आणि अखेर १८ जून २०१६ रोजी तिला वैमानिक म्हणून परवाना मिळाला. यानंतर कॅलिफोर्नियाच्या ऑरेंज सिटीमध्ये टोयाटो रेसिंग डेव्हलपमेंट या नामांकित कंपनीत मेकॅनिकल डिझाइन इंजिनीअर म्हणून तिच्या कामाला सुरुवात झाली. दरम्यान तिने नासा मध्येही अर्ज केला होता, मात्र तिथे नागरिकत्वाच्या मुद्यावरून तिची निवड होऊ शकली नाही.  यानंतर संजलने नासासाठी काम करणाऱ्या ब्ल्यू ओरिजनमध्ये अर्ज केला व त्या ठिकाणी तिची निवड झाली. आता न्यु शेफर्ड या अंतराळ यानाचे आरेखन करणाऱ्या दहा जणांच्या टीममध्ये संजलचा समावेश असल्याने, मराठी माणसाबरोबरच देशासाठी देखील ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!