कांदा दरात चढ-उतार सुरूच

मंगळवारी मनमाड  कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ३५५ ट्रॅक्टर इतकी आवक झाली.

मनमाड :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे भाव ३ हजार ४०० रुपये क्विंटलवर पोहोचले होते. परंतु, मंगळवारी कांद्याच्या भावात क्विंटलमागे ३५० रुपयांची घसरण झाली.

मंगळवारी मनमाड  कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ३५५ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. किमान ५५० ते  कमाल ३४००, सरासरी ३०५० रुपये क्विंटल असे कांद्याला भाव होते. मक्याची ४६ नग इतकी आवक झाली. १०९१ ते १८३५ सरासरी १ हजार ६०० रुपये क्विंटल असा मक्याला भाव होता.https://f7893e803d06cb23240fe8e8a7d31e4a.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

हे वाचले का?  नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा

काही दिवसांपासून संततधार तर, कधी मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिराने बाजारात दाखल होणार आहे. त्यातच राज्यातील शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण  झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात गत सप्ताहाच्या तुलनेत वाढ झाली. परंतु, या भाववाढीत सातत्य नाही. कांद्याचे बाजारभाव वाढलेल्या दरात स्थिर राहावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”