कार्तिकचं तुफानी अर्धशतक, तामिळनाडू लागोपाठ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत

रविवारी होणार अंतिम सामना

Syed Mushtaq Ali Trophy 2021 : सय्यद मुश्ताक अली टी20 चषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात राजस्थानचा पराभव करत तामिळनाडूनं लागोपाठ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. अरुण कार्तिकच्या अप्रतिम फलंदाजीमुळे तामिळनाडूनं राजस्थानवर सात गड्यानं मात करत अंतिम फेरीत धडक मारली. अरुण कार्तिकनं ९ चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीनं ८९ धावांची खेळी केली. रविवारी, ३१ जानेवारी रोजी राजस्थानचा सामना बडोद्याशी होणार आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात राजस्थाननं नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी केली. राजस्थाननं प्रथम फलंदाजी करताना ९ गड्यांच्या मोबदल्यात १५४ धावा केल्या. प्रत्त्युत्तर तामिळनाडूनं १८.४ षटकांत तीन गड्याच्या मोबदल्या १५८ धावा चोपल्या.

अरुण कार्तिकनं ५४ चेंडूत नाबाद ८९ धावांची खेळी केली. तर कर्णधार दिनेश कार्तिकनं १७ चेंडूत नाबाद २६ धावांची छोटेखानी खेळी केली. दिनेश कार्तिक आणि अरुण कार्तिक यांनी चौथ्या गड्यासाठी महत्वाची ८९ धावांची भागिदारी केली. अरुण कार्तिकला सामनावीराच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.