कॅनडानं भारताला पुन्हा डिवचलं; म्हणे ‘या’ राज्यात प्रवास करणं असुरक्षित, नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी!

दोन्ही देशांनी परस्परांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. त्यातच कॅनडानं हे पाऊल उचललं आहे.

खलिस्तान टायगर फोर्सचा ( केटीएफ ) नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडादरम्यान संबंधांमध्ये तणावर निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. अशातच कॅनड सरकारनं पुन्हा एकदा भारताला डिचवलं आहे. कॅनडातील नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. त्यात भारतातील केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरचा प्रवास टाळण्याचा सल्ला कॅनडा नागरिकांना दिला आहे.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

कॅनडा सरकारनं सांगितल्यानुसार, “सुरक्षिततेच्या कारणास्तव जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाचा प्रवास टाळावा. तिथे दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. यातून लडाख या केंद्र शासित प्रदेशाला वगळण्यात आलं आहे.”

नेमकं प्रकरण काय?

खलिस्तान टायगर फोर्सचा नेता हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टड्रो यांनी पार्लटमेंटमध्ये केला. मात्र, हे आरोप ‘निर्थक आणि कोणाची तरी फूस असलेले’ आहेत अशी टीका भारताने केली.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

निज्जर कोण होता?

४५ वर्षीय हरदीप सिंग निज्जर हा प्रतिबंधित केटीएफचा (खलिस्तान टायगर फोर्स) प्रमुख होता आणि भारताकडून सर्वाधिक शोध घेतल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांपैकीच एक होता. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. पश्चिम कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतामधील सरे येथील गुरुद्वारात १८ जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित