खाद्य गृहातील गर्दी काही हटेना

दिवसभरात पाच आस्थापनांवर कारवाई

नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आणि महापालिका यांनी धडक कारवाई सुरू केली असली तरी अनेक जण आजही मुखपट्टीविना वावरत असल्याचे कारवाईतून उघड होत आहे. दुसरीकडे हॉटेल, हातगाडी-स्टॉलवरील खाद्यगृह, आईस्क्रिम पार्लर येथील गर्दी काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कठोर कारवाईचे सत्र राबविले. सोमवारी दिवसभरात मुखपट्टी परिधान न करणाऱ्या २२९ जणांवर पालिकेच्या पथकांनी कारवाई केली. सुरक्षित अंतराचे पथ्य न पाळल्यावरून पाच हॉटेल, तत्सम आस्थापनांवर तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावरून दोघांवर कारवाई झाली. दिवसभरात एकूण २३६ जणांवर कारवाई करीत एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरात करोनाचा उद्रेक झाला असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे नियमावली पाळण्याकडे नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत आहे. जीवनावश्यक वगळता अन्य दुकानांसाठी सकाळी सात ते सायंकाळी सात ही वेळ ठरवून दिली. परंतु, कॉलेज रोड, गंगापूर रस्त्यासह उपनगरे, कॉलनी परिसरातील अनेक दुकाने सर्रास उघडी असतात. खाद्यगृहे, परमिट रूम, बार यांना रात्री नऊपर्यंत परवानगी आहे. तिथे ५० टक्के क्षमतेचा निकष पाळणे बंधनकारक आहे. खाद्यपदार्थ घरापर्यंत वितरित करणाऱ्या आस्थापना १० वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु, इतर खाद्यस्थळे म्हणजे रस्त्यावरील हातगाडय़ा, ठेले, स्टॉल यांना ही मुभा नसली तरी अनेक ठिकाणी ती विहित मुदतीनंतर सुरू असतात. तिथे गर्दी झालेली पाहायला मिळते. बंदीस्त हॉटेलमध्ये निम्म्या क्षमतेच्या निकषाकडे दुर्लक्ष केले जाते. पालिका आयुक्त आणि पोलीस यांच्या कारवाईत अनेकदा ही बाब समोर आली आहे. हॉटेल, हातगाडय़ांवरील खाद्य पदार्थ विक्री, आईस्क्रिम पार्लर या ठिकाणी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

हे वाचले का?  सांगली, नाशिकला पावसाने झोडपले; द्राक्ष, डाळिंबाला फटका; रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान

सोमवारी दिवसभरात नाशिकरोड विभागात एक, नाशिक पश्चिममध्ये तीन आणि पंचवटी विभागात एक खाद्यगृहात सुरक्षित अंतराचे पालन नसल्यावरून कारवाई झाली. संबंधित पाच आस्थापनांना प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे २५ हजार रुपये दंड करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाच्या संचालिका डॉ. कल्पना कुटे यांनी दिली. मुखपट्टी परिधान न करणाऱ्यांना पकडून थेट तपासणीला नेण्याची पध्दत पोलिसांनी अवलंबली आहे. पालिकेच्या पथकांनी मुखपट्टी नसल्यावरून नाशिकरोड भागात १९, सिडको विभागात ४८, सातपूरमध्ये ५१, नाशिक पूर्व विभागात २१ जणांवर कारवाई करून एकूण २७ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. नाशिकरोड विभागात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल नाशिकरोड आणि नाशिक पश्चिम विभागात दोघांना प्रत्येकी हजार रुपये दंड करण्यात आला.

दिवसभरात पाच आस्थापनांवर कारवाई

दिवसभरात पाच आस्थापनांवर कारवाई

नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आणि महापालिका यांनी धडक कारवाई सुरू केली असली तरी अनेक जण आजही मुखपट्टीविना वावरत असल्याचे कारवाईतून उघड होत आहे. दुसरीकडे हॉटेल, हातगाडी-स्टॉलवरील खाद्यगृह, आईस्क्रिम पार्लर येथील गर्दी काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने कठोर कारवाईचे सत्र राबविले. सोमवारी दिवसभरात मुखपट्टी परिधान न करणाऱ्या २२९ जणांवर पालिकेच्या पथकांनी कारवाई केली. सुरक्षित अंतराचे पथ्य न पाळल्यावरून पाच हॉटेल, तत्सम आस्थापनांवर तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावरून दोघांवर कारवाई झाली. दिवसभरात एकूण २३६ जणांवर कारवाई करीत एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हे वाचले का?  वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांचे नियंत्रण हवे; गृह राज्यमंत्र्यांची अपेक्षा

शहरात करोनाचा उद्रेक झाला असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे नियमावली पाळण्याकडे नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत आहे. जीवनावश्यक वगळता अन्य दुकानांसाठी सकाळी सात ते सायंकाळी सात ही वेळ ठरवून दिली. परंतु, कॉलेज रोड, गंगापूर रस्त्यासह उपनगरे, कॉलनी परिसरातील अनेक दुकाने सर्रास उघडी असतात. खाद्यगृहे, परमिट रूम, बार यांना रात्री नऊपर्यंत परवानगी आहे. तिथे ५० टक्के क्षमतेचा निकष पाळणे बंधनकारक आहे. खाद्यपदार्थ घरापर्यंत वितरित करणाऱ्या आस्थापना १० वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु, इतर खाद्यस्थळे म्हणजे रस्त्यावरील हातगाडय़ा, ठेले, स्टॉल यांना ही मुभा नसली तरी अनेक ठिकाणी ती विहित मुदतीनंतर सुरू असतात. तिथे गर्दी झालेली पाहायला मिळते. बंदीस्त हॉटेलमध्ये निम्म्या क्षमतेच्या निकषाकडे दुर्लक्ष केले जाते. पालिका आयुक्त आणि पोलीस यांच्या कारवाईत अनेकदा ही बाब समोर आली आहे. हॉटेल, हातगाडय़ांवरील खाद्य पदार्थ विक्री, आईस्क्रिम पार्लर या ठिकाणी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

हे वाचले का?  नंदुरबार जिल्ह्यातील गावात दारुबंदीसाठी मतपत्रिकेवर बाटली झाली आडवी