‘घरकुल’साठी गायरान जमिनींचाही विचार करावा

गायरान जमीनही सार्वजनिक हितासाठी प्राप्त करून त्यावरही नागरिकांना घरकुले उपलब्ध करून देण्यात यावी

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे प्रतिपादन

नाशिक : पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसा योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून प्राधान्याने भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच गायरान जमीनही सार्वजनिक हितासाठी प्राप्त करून त्यावरही नागरिकांना घरकुले उपलब्ध करून देण्यात यावी, ग्रामीण भागातील गरजू प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

मंगळवारी नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ‘महाआवास अभियान’ ग्रामीणमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींना गमे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, कामगार उपायुक्त विकास माळी, नाशिक प्रकल्प संचालक उज्वला बावके, धुळे प्रकल्प संचालक डी. एम. मोहन, तहसीलदार (निफाड) शरद घोरपडे, अकोल्याचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, ग्रामसेवक, सरपंच, सर्व बँकाचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण आणि राज्यपुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच गुणात्मक प्रगती होण्याच्या दृष्टीने राज्यात १०० दिवसांचे ‘महाआवास अभियान- ग्रामीण‘ सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून ग्रामीण भागात पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांनी ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काच्या घरकुलासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही गमे यांनी केले.

सोहळ्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सवरेत्कृष्ट कामगिरीबद्दल धुळे, अहमदनगर आणि जळगाव या अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या जिल्ह्यंना तर सवरेत्कृष्ट कामगिरीबद्दल अकोले, जामखेड आणि मुक्ताईनगर या तालुक्यांना गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यतील चिंचवे, शेवरे आणि देवपाडा या तीन ग्रामपंचायतींचाही गौरव झाला. सवरेत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वित्तीय संस्था, ग्रामीण शासकीय जागा, वाळू उपलब्ध करून देणारे तहसीलदार, राज्यपुरस्कृत आवास योजनेंतर्गत सवरेत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हे, तालुके व ग्रामपंचायती, वित्तीय संस्था आदींचा सत्कार करण्यात आला.