घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ, दिल्लीसह मुंबईत किंमत हजार रुपयांच्या पार

गेल्या १२ दिवसांमध्ये ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

दिवसेंदिवस महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामन्य नागरीक बेजार झाले आहेत. आता पुन्हा एकदा घरगुती सिलेंडरच्या वाढ करण्यात आली आहे. या नव्या दरानुसार सिलेंडरच्या किंमती १ हजार रुपयाच्या पुढे गेल्या आहेत. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये ३ रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे. तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर ८ रुपयांनी महागला आहे.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा

दिल्लीसह मुंबईत गॅसची किंमत
दिल्लीसह मुंबईत घरगुती सिलेंडर १ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. मुंबईमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत १००३ रुपये झाली आहे. तर गेल्या एक वर्षात दिल्लीत एलपीजी सिलेंडर ८०९ रुपयांवरून १००३ रुपयांवर पोहचला आहे. तसेच कोलकातामध्ये एलपीजीची किंमत १०२९ रुपये आणि चेन्नईत १०१८.५ रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अजून भार पडणार आहे.

यापूर्वी वाढल्या होत्या एलपीजीच्या किमती
गेल्या १२ दिवसात घरगुती सिलेंडरमध्ये झालेली ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी ७ मे २०२० ला घरगुती सिलेंडरमध्ये ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यावेळेस सर्वसामान्य नागरीकांकडून या दरवाढीचा जोरदार विरोध करण्यात आला होता. तसेच विरोध पक्षांनी या गॅसदरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता ही दुसरी वाढ करण्यात आली आहे.