चंद्रपूरची मराठमोळी दिपाली मासिरकर राष्ट्रपती निवडणुकीची निरीक्षक

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षासाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील रहिवासी व मराठी शाळेतून शिक्षण घेतलेल्या दिपाली रविचंद्र मासीरकर यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीकरिता संचालक म्हणून दिल्ली येथे नेमणूक केली आहे. त्या निवडणुकीचे निरीक्षण करणार आहे, दिपाली २००८ च्या नागालँड तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. एका मरामोळ्या मुलीला मिळालेला हा मान चंद्रपूरसह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.

हे वाचले का?  आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन

आज (१८ जुलै) रोजी देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपदासाठी रालोआकडून द्रौपदी मुर्मू तर संपुआकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षासाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून दिपाली मासिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संचालकपदी नियुक्तीपूर्वी नागालँडमधील कोहीमा येथे पोलीस उप-महानिरीक्षक पदावर कार्यरत –

दिपाली यांनी मुंबई येथे सहायक महानिरीक्षक या पदावर कार्य केले. नागपूर येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी सांभाळली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्तीपूर्वी नागालँडमधील कोहीमा येथे पोलीस उप-महानिरीक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या. भारत निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आता त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विशेष म्हणजे, दिपलीचे वडील वन अधिकारी होते.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले