चिंता वाढवणारी बातमी! फ्रान्समध्ये आढळला नवीन करोना विषाणूंचा पहिला रुग्ण

वेगाने संसर्ग होणारा करोनाचा हा नवा प्रकार अनेक देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे

ब्रिटनमध्ये नवीन करोना विषाणूचा प्रकार समोर आला असून फ्रान्समध्ये पहिला रुग्ण सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. वेगाने संसर्ग होणारा करोनाचा हा नवा प्रकार अनेक देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर ५० हून अधिक देशांनी ब्रिटनमधील वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. एएफपीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

हे वाचले का?  PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले

दरम्यान फ्रान्समधील हा पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये वास्तव्यास होता. लंडन येथून १९ डिसेंबरला तो परतला होता. या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणं दिसत नसून फ्रान्समधील आपल्या घऱात विलगीकरणात असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. २१ डिसेंबरला वैद्यकीय तपासणी केली असताना त्याला करोनाच्या नव्या विषाणूंची लागण झाली असल्याचं समोर आलं.

फ्रान्समध्ये करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात केली आहे. यावेळी कोणामध्ये लक्षणं आढळली तर त्यांना विलगीकरणात ठेवलं जाणार आहे.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी