चीनचा संरक्षण खर्च २३२ अब्ज डॉलर; भारताच्या तुलनेत तिप्पट तर अमेरिकेच्या तुलनेत २६ टक्के तरतूद

चीनने मंगळवारी संरक्षणासाठी अर्थसंकल्प जाहीर केला, त्यामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी २३२ अब्ज डॉलर तरतूद करण्यात आली आहे.

पीटीआय, बीजिंग

चीनने मंगळवारी संरक्षणासाठी अर्थसंकल्प जाहीर केला, त्यामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी २३२ अब्ज डॉलर तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण क्षेत्रासाठी ७.२ टक्के जास्त खर्च केला जाणार आहे. अमेरिकेबरोबरची वाढती स्पर्धा, तैवानवरील वर्चस्वाचा वाद, दक्षिण चिनी समुद्रातील वाढता तणाव, भारताबरोबर सीमेवर संघर्ष या पार्श्वभूमीवर चीन संरक्षण क्षेत्राकडे विशेष लक्ष देत आहे.

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

चीन हा अमेरिकेनंतर संरक्षणासाठी सर्वाधिक खर्च करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अमेरिकेच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी ८८६ अब्ज डॉलरची तरतूद आहे. चीनने जाहीर केलेली १.६७ ट्रिलियन युआन म्हणजे २३२ अब्ज डॉलर ही तरतूद अमेरिकेच्या संरक्षण खर्चाच्या सुमारे २६ टक्के इतकी आहे. भारताने या वर्षी संरक्षणासाठी ६ लाख २१ हजार ५४१ कोटी रुपये म्हणजे सुमारे ७४.८ अब्ज डॉलर इतका खर्च निर्धारित केला आहे. भारताच्या तुलनेत तिपटीपेक्षा जास्त खर्च चीन संरक्षणासाठी करणार आहे.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

२०२७ हे चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लष्कराचे शताब्दी वर्ष आहे. तोपर्यंत खर्चीक आधुनिकीकरणाचे ध्येय साध्य करण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून त्यांना २०४९पर्यंत जगातील सर्वोच्च लष्करी ताकद होता येईल.

पंतप्रधान ली कियांग यांनी चीनचे कायदेमंडळ असलेल्या ‘नॅशनल पीपल्स कॉन्फरन्स’मध्ये (एनपीसी) संरक्षण खर्चासाठी वाढीचा प्रस्ताव मांडला. चीनचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाच्या संरक्षणासाठी, चीनचे सैन्य सज्ज असेल. त्यासाठी अधिक समन्वयाने प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले.

हे वाचले का?  PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले