छत्तीसगड सरकारनं माफ केला टाटा प्रोजेक्टचा २०० कोटी रुपयांचा दंड

दोन आयएएस अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली कारवाई रद्द

छत्तीसगडमधील भूपेश बघेल यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने टाटा प्रोजेक्ट्सवर लावण्यात आलेला २०० कोटींचा दंड माफ केला आहे. ग्रामीण ब्रॉडबॅण्ड प्रकल्पाच्या नोडल एनज्सीशी संबंधित दोन आयएएस अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली होती. ३०५७ कोटींचा ग्रामीण ब्रॉडब्रॅण्ड प्रकल्प वेळमर्यादेत पूर्ण न केल्याने टाटा प्रोजेक्टला हा दंड ठोठावण्यात आला होता.

इंडियन एक्स्प्रेसच्या हाती आलेल्या कागदपत्रांनुसार, राज्य सरकार आणि कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार हा दंड ठोठावण्यात आला होता. याशिवाय मुख्य सचिवांच्या नेतृत्वातील समितीकडून या दंडाची पुष्टी करण्यात आली होती. इतकंच नाही तर राज्य सरकारने टाटा प्रोजेक्टला दोन वर्षात दोन वेळा वेळमर्यादा वाढवून दिल्यानंतर लावण्यात वसूल करण्यात आलेला २८.७९ कोटींचा दंड परत केला आहे.

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

जुलै २०१८ मध्ये कंपनीकडे सोपवण्यात आलेला भारतनेट छत्तीसगड प्रकल्प एका वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होतं. यामध्ये राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ८५ ब्लॉक आणि ५९८७ ग्रामपंचायत जोडण्यासाठी ३२ हजार ४६६ किलोमीटरपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्कचा विस्तार करायचा होता. इंटरनेटच्या सहाय्याने ग्रामपंचायतींना जोडणं हा देशव्यापी भारतनेट प्रकल्पाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाचा योजनेच्या हा एक प्रमुख भाग असून २.५ लाख गावांना जोडण्याची योजना आहे. २५ सप्टेंबर २०२० पर्यंत टाटा प्रोजेक्ट फक्त १३९४ ग्राम पंचायतींमध्ये (एकूण २४ टक्के) ब्रॉडबॅण्डसाठी पायाभूत सुविधा तयार करु शकलं होतं.

हे वाचले का?  अलिबागच्या नाट्यगृहासाठी ९ कोटी ३२ लाखांचा निधी

२३ जानेवारीला समीर विष्णोई यांना छत्तीसगड इन्फोटेक प्रमोशन सोसायटीचे (ChIPS) सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. सीएचआयपीएस राज्यातील नोडल एजन्सी आहे ज्यांच्यावर प्रकल्पाची पाहणी करण्याची जबाबदारी होती. आपलेच दोन माजी सीईओ एलेक्स पॉल मेनन आणि देवसेनापती यांनी घेतलले निर्णय यावेळी रद्द करण्यात आले. टाटा प्रोजेक्टने वेळमर्यादेत प्रकल्प पूर्ण न केल्याने त्यांनी दंड ठोठावला होता. समीर विष्णोई यांनी नव्याने दंड ठोठावण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी दंड माफ करण्यात आला असून रक्कम परत करण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत.

हे वाचले का?  SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?