जेहाननं रचला इतिहास; F2 रेस जिंकणारा पहिला भारतीय ड्राइव्हर ठरला

असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

बहरीन येथे पार पडलेल्या फॉर्मुला टू रेसमध्ये भारताच्या जेहान दारुवाला यानं इतिहास रचला आहे. साखिर ग्रां. प्री या स्पर्धेत जेहानं यांनं फार्मुटा टू रेस जिंकली आहे. अशी कामगिरी करारा जेहान पहिला भारतीय ठरला आहे. फॉर्मूला टू विजेता मिक शूमाकर आणि डेनिअल टिकटुम यांच्याविरोधातील लढतीत २२ वर्षीय जेहाननं विजय मिळवला.

हे वाचले का?  ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

रेयो रेसिंगसाठी ड्राइव्हिंग करणाऱ्या जेहानं यानं ग्रीडवर दूसऱ्या क्रमांकानं सुरुवात केली होती. तो आणि डेनियल टिकटुम सोबत होते. टिकटुमने जेहानला अनेकदा साइडला कारण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या लढाईचा फायदा घेत शूमाकर पुढे निघून गेला. ही बाब जेहानच्या लक्षात आल्यानंतर त्यानं आपला स्पीड तात्काळ वाढवला. त्यानंतर जेहान यानं दोघांनाही मागे टाकत स्पर्धेवर नाव कोरलं. दुसऱ्या कर्मांकावर जपानी युकी सुनोडा राहिला. जेहान आणि युकी यांच्यामध्ये फक्त ३.५ सेकंदाचं अंतर होतं. गतविजेता टिकटुम तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला.