जे ऐकिले त्याहुनि रम्य जाणिले…!

गांगणगावला वाहनातून उतरून सर्वांची पावले पाटीलपाड्यातून वाट काढत बारडगडाकडे चालू लागली.

नाशिकच्या दुर्गप्रेमींची बारडगड चढाई

नाशिक : दुर्ग लहान असो किं वा मोठा. कोणत्याही दुर्गावर, गडकिल्ल्यावर चढाई करताना काळजी घेणे आवश्यकच असते. आणि त्यातही असा दुर्ग चढाई करणाऱ्यांसाठी एकदमच नवीन असेल तर… त्यातही ही चढाई १५ ते २० जणांचा चमू एकाच वेळी करत असेल तर…त्यातही करोना महामारीमुळे जाहीर झालेल्या टाळेबंदी शिथिलीकरणाच्या प्रक्रि येनंतर इतक्या जणांची ही अनवट दुर्गावरील पहिलीच चढाई असेल तर…अशा कित्येक जर-तर शक्यता दूर सारून नाशिक येथील वैनतेयच्या दुर्गप्रेमींनी पालघरच्या डहाणू तालुक्यातील बारडगडाची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण के ली. बारडगड नव्यानेच प्रकाशात आला असल्यामुळे या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

येथील वैनतेय गिर्यारोहण आणि गिरीभ्रमण संस्थेच्या नेतृत्वाखाली बारडगडावर मोहीम आखली गेली. जगदीश धानमेहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विस्मृतीत गेलेला बारडगड प्रकाशात आणला. गडाविषयीची त्रोटकच माहिती उपलब्ध आहे. सुमारे १९२४ फू ट उंचीचा बारडगड तारापूर बंदर, किनारपट्टीवरील किल्ले तसेच शत्रूच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी पेशवाईत उभारला गेल्याचे इतिहासतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्यामुळे बारगडाविषयीची उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. नाशिकहून पहाटे वैनतेयच्या चमूने छोट्या प्रवासी वाहनातून डहाणूच्या दिशेने कू च के ले. त्र्यंबके श्वार, जव्हार, कासामार्गे मुंबई-अहमदाबाद महामार्ग मध्येच सोडून गाडी धुंदलवाडी-आंबेसरीमार्गे गांगणगावच्या रस्त्याला लागली आणि रानसौंदर्य मनात भरण्यास सुरुवात झाली. पाच ते सहा तासांच्या प्रवासाने आळसावलेले तन-मन उल्हसित झाले. सध्या दुर्मीळ होत चाललेली ताडाची झाडे या परिसरात बऱ्यापैकी आहेत. नीरेचा एके क थेंब जमा करण्यासाठी अनेक झाडांवर मडकी टांगलेली होती. गांगणगावला वाहनातून उतरून सर्वांची पावले पाटीलपाड्यातून वाट काढत बारडगडाकडे चालू लागली. गडाच्या मागील बाजूने चमू उतरणार असल्याने वाहन त्या बाजूकडे गेले.

हे वाचले का?  नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी

मार्गदर्शक म्हणून याआधी गडावर जाऊन आलेले धानमेहेर यांच्या गटातील नंदकु मार कारभारी सोबत होते. त्यांचा उत्साह अक्षरश: उतू जात होता. पाटीलपाड्यातून जाणारी पायवाट बारडगडाच्या चढाला लागल्यावर प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेची परीक्षा सुरू झाली. मध्येच दुतर्फा असलेल्या रानझाडांची पाने-फु ले अंगाला स्पर्शून शुभेच्छा देत होती. आणि खाली पायवाटेवर मध्येच वर आलेले दगड जणूकाही पादत्राणांचे मोजमाप घेत होते.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश

दुपारचे टळटळीत ऊन आणि किनारपट्टीच्या भागातील गड असल्याने दमट हवामानामुळे लवकरच दमछाक होण्यास सुरुवात झाली. राहुल सोनवणे, सुदर्शन कु लथे, आशीष शिंपी ही मार्गदर्शक मंडळी सर्वांचा उत्साह कायम राहावा म्हणून प्रयत्नरत होती. थोड्याशा चढाईनंतर थकलेल्या शरीराला दिलासा मिळावा म्हणून मध्येच काहीशी सपाटी आणि पुन्हा चढण असा एकू ण मार्ग होता. अखेर सर्व मंडळी गडाच्या माथ्यावर पोहचली आणि तिथून आजूबाजूला दिसणारे निसर्गसौंदर्य पाहून थकवा क्षणात दूर पळाला. गडावर सातवाहनकालीन खांब, तटबंदी अर्थात भग्नावशेष पाहण्यास मिळाले. टाक्यातील गार पाणी अमृताहून गोड वाटले. देवीच्या भुईघरातच पोटतृप्ती झाली. त्याच ठिकाणी बारडगडावरील लेखाचे वाचनही करण्यात आले. सर्व काही न्याहाळत असताना मार्गदर्शकांचे घड्याळाकडेही लक्ष होते. त्यामुळे गड पायउतार होण्याचा निर्णय घेण्यात आला. पुन्हा दाट झाडीतून पायवाटेने प्रवास सुरू झाला. सूर्य मावळतीकडे जाऊ लागल्याने गड उतरतानाच काळोख दाटण्याची भीती होती. झालेही तसेच. काळोखात वाट शोधताना नंदकु मार कारभारींचा गोंधळ उडू लागल्यावर राहुल सोनवणे यांनी चमूचे सारथ्य करत आपल्या अनुभवकौशल्याचा वापर करत सर्वांना सुखरूप खाली आणले. रस्त्यात एक-दोन नालेही ओलांडावे लागले. पायथ्याच्या अंधारातून वाहनापर्यंत मार्ग दाखविण्यासाठी एका आदिवासी महिलेची आणि तिच्या मुलाने के लेली मदत मोलाची ठरली. आपणास घेऊन जाणारे वाहन दिसताच सर्वांना हायसे वाटले. सर्वजण वाहनात स्थानापन्न होऊन एक कधीही न विसरता येणारा ठेवा सोबत घेऊन नाशिककडे परतीच्या मार्गाला लागले.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

(((बारडगडाच्या चढाईवर दुर्गप्रेमी आणि गडावरील सातवाहनकालीन खांब असलेले भुईघर)))