डिसेंबरमध्ये विक्रमी ‘जीएसटी’ संकलन

केंद्र सरकारला १.१५ लाख कोटींचा महसूल

अप्रत्यक्ष कर संकलनाचा सलग तिसऱ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा ‘जीएसटी’ अर्थात वस्तू व सेवा कररूपी महसूल डिसेंबर २०२० मध्ये प्रथमच १,१५,१७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

वार्षिक तुलनेत १२ टक्क्य़ांची भर टाकणारे सरकारचे कर संकलन प्रणाली सुरू झालेल्या जुलै २०१७ कालावधीनंतर प्रथमच विक्रमी स्तरावर पोहोचले आहे. डिसेंबर २०१९ मधील १.०३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ते वाढले आहे.
अप्रत्यक्ष कर संकलनातील वाढ व त्याचा लक्षणीय टप्पा हा करोना आणि टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे लक्षण मानले जात आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये ८७ लाख जीएसटीआर-३बी भरणा झाला आहे.
वस्तू व सेवा कर प्रणाली १ जुलै २०१७ पासून अस्तित्वात आली. २१ महिन्यात डिसेंबरमध्ये प्रथमच १.१५ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला. यापूर्वी, एप्रिल २०१९ मध्ये १,१३,८६६ लाख कोटी रुपये असे सर्वोच्च कर संकलन झाले होते.
कर प्रणाली लागू झाल्यापासून संकलनाने एप्रिल २०२० मध्ये ३२,१७२ कोटी रुपये असा किमान महसूल मिळविला होता. टाळेबंदीचा हा परिणाम होता. तर सप्टेंबरमध्ये शिथील टाळेबंदीमुळे त्यात प्रथमच वार्षिक वाढ नोंदली गेली.

हे वाचले का?  Budget 2024 :पदकवीर दोघेच! अर्थसंकल्पात बिहार, आंध्रवर मेहेरनजर, महाराष्ट्र ‘कोरडा’च!, रोजगारनिर्मितीसा अनेक योजना

गेल्या महिन्यात आयात वस्तूंमार्फत २७ टक्के अधिक महसूल जमा झाला. तर देशांतर्गत महसूलामुळे ८ टक्के वाढ झाली. अनेक राज्यांनी ६ ते १५ टक्केपर्यंत कर संकलनात वाढ नोंदविल्यामुळे हे शक्य झाले.

अर्थव्यवस्थेवरील विश्वास यापुढील कालावधीतही दिसू शकतो व कर संकलन वाढू शकते, असे डेलॉइट इंडियाचे वरिष्ठ संचालक एम. एस. मणी यांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआय या देशव्यापी उद्योग संघटनेचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी, उद्योग-निर्मिती क्षेत्र रुळावर येत असल्याचे चित्र कर संकलनवाढीतून दिसत असल्याचे नमूद केले.

वित्त वर्ष २०१९-२० मधील १२ पैकी ८ महिन्यांमध्ये वस्तू व सेवा कर संकलनाने एक लाख कोटी रुपयांचा स्तर गाठला. चालू वित्त वर्षांत सप्टेंबपर्यंत ते एक लाख कोटी रुपयांच्या आतच होते.

एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान मात्र त्यात वार्षिक तुलनेत १४ टक्के घसरण झाली आहे, तर तिमाहीत त्यात २३.९ टक्के घसरण झाली.

हे वाचले का?  सायबर गुन्हेगारीत वाढ, सहा महिन्यात १५ कोटीहून अधिक रक्कम लंपास

२०२०मधील लाख कोटीची परंपरा :

डिसेंबर – रु.१,१५,१७४ कोटी
नोव्हेंबर – रु.१,०४,९६३ कोटी
ऑक्टोबर – रु.१,,०५,१५५ कोटी