“…तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती”; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी काँग्रेसला इशारा दिला होता. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर खोचक शब्दात टीका केली आहे.

देशात लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाच टप्प्यांत मतदान पार पडले. आता आणखी दोन टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान पार पडलेले आहे.लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर काँग्रेसने स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विशाल पाटील यांनी हजेरी लावल्यामुळे ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी यावरून काँग्रेसला इशारा दिला होता. काँग्रेसने पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करत आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर खोचक शब्दात टीका केली आहे. “आमची भूमिका मान्य केली असती तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

हे वाचले का?  मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह