तिसऱ्या श्रावणी सोमवारीही मंदिरांबाहेरूनच दर्शन

नमामि शंकरा..शिवामी शंकरा..बम बम भोलेच्या गजरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भाविकांनी शहरासह जिल्ह्य़ातील शिवमंदिरांबाहेर गर्दी केली.

नाशिक : नमामि शंकरा..शिवामी शंकरा..बम बम भोलेच्या गजरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भाविकांनी शहरासह जिल्ह्य़ातील शिवमंदिरांबाहेर गर्दी केली. करोनामुळे मंदिरे बंद असली तरी भाविकांच्या उत्साहावर याचा परिणाम झालेला नाही. मंदिरात जाता येत नसले तरी बाहेरून का होईना दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी मंदिर परिसरात धाव घेतली होती. भाविकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली तिसऱ्या सोमवारची ब्रह्मगिरी प्रदक्षिणाही होऊ शकली नाही. भाविकांनी प्रदक्षिणेसाठी जाऊ नये म्हणून पोलिसांकडून प्रदक्षिणा मार्गावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे दिवाळी पाडव्यापासून ऑनलाईन दर्शन सुविधा

सोमवारी सकाळपासूनच शिवमंदिरांच्या परिसरात भाविकांचे येणे सुरू झाले होते.  कपालेश्वर, निळकं ठेश्वरसह गोदाकाठावरील शिवमंदिरांकडे जाणारी वाट पोलिसांनी दुभाजक लावून बंद के ले होते. त्र्यंबके श्वरही यास अपवाद राहिले नाही. मंदिरांचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आलेला असून पोलिसांनी मंदिराच्या दिशेने येणारे रस्ते बंद के ले होते. यामुळे भाविक दुरूनच कळसाचे दर्शन घेत माघारी फिरत होते. श्रावणात तिसऱ्या सोमवारच्या  ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला विशेष महत्त्व असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती. प्रदक्षिणेसाठी कोणी जाऊ नये म्हणून मार्गावर दुभाजक आडवे टाकण्यात आले होते. तसेच पेगलवाडी फाटा परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात प्रवेशासाठी गजानन महाराज मंदिर चौक रस्ता खुला ठेवण्यात आला होता.

हे वाचले का?  सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

त्र्यंबकमधील जुना महादेव मंदिर, ॠणमुक्ते श्वर महादेव, मुकू ंदेश्वर महादेव शिवमंदिर परिसरात भाविकांनी गर्दी के ली होती. त्र्यंबके श्वर तसेच कपालेश्वर देवस्थानच्या वतीने दुपारी श्रींची मिरवणूक काढण्यात आली. आरती, अभिषेकासह श्रींच्या मुखवटय़ाचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रशासनाच्या र्निबधामुळे व्यावसायिकांचा रोजगार बुडाला. तिसऱ्या सोमवारनिमित्त त्र्यंबके श्वरसाठी असलेल्या र्निबधांमुळे  राज्य परिवहन महामंडळालाही मोठा फटका बसला. दरवर्षी तिसऱ्या फे रीसाठी राज्य परिवहनकडून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात येत असते. त्याव्दारे लाखो रुपयांचे उत्पन्न राज्य परिवहनला एका दिवसात मिळते. यंदा मात्र या उत्पन्नापासून राज्य परिवहनला मुकावे लागले.