तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

दर्शन रांगेतील भाविकांना त्रास होऊन नये आणि राजशिटाचार पाळून अवघ्या दहा मिनिटात त्यांनी दर्शन घेवून पुन्हा दर्शन रांग पूर्ववत केल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या सह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी श्री विठ्ठल रुक्मिनिमातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीने मुख्यमंत्री राव यांचा सत्कार केला. दर्शन रांगेतील भाविकांना त्रास होऊन नये आणि राजशिटाचार पाळून अवघ्या दहा मिनिटात त्यांनी दर्शन घेवून पुन्हा दर्शन रांग पूर्ववत केल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शनासाठी येताना ते आणि आणि त्यांचे सहकारी गाडीतून मंदिराकडे न येता पायी चालत आले. निवडक मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी देवाचे दर्शन घेतले.अवघ्या दहा मिनिटात दर्शन घेतले. मंदिर समितीने मुख्यमंत्री यांचा सत्कार केला. त्या नंतर लगेच मुख्यमंत्री देवळातून बाहेर आले.या नंतर तालुक्यातील सरकोली येथे कार्यक्रमास गेले.

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे दिवाळी पाडव्यापासून ऑनलाईन दर्शन सुविधा

येथील राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि त्यांचे समर्थक भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात ते काय बोलतात याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी राव यांच्या दौर्यामुळे पोलीस प्रशासनावर ताण पडला आहे.