त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश

नाशिक जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले असून त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके आढळून आली आहेत.

नाशिक : जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले असून त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके आढळून आली आहेत. या बालकांवर उपचारासाठी ग्राम बाल विकास केंद्र (व्हीसीडीसी) सुरू करण्याचे आदेश बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

हे वाचले का?  अजित पवार गटाकडून आमदारांना संधी, चार जणांना एबी अर्ज, तिघे बाकी

त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी, त्र्यंबक ग्रामीण, रोहिले, सामुंडे, टाकेदेवगांव येथे १४ तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. या बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील बालविकास प्रकल्प कार्यालय आणि आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. कुपोषित बालकांकडे दुर्लक्ष केल्यास बालकांमध्ये खुजेपणा, लुकडेपणा यासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

या बालकांना बरे करण्यासाठी अंगणवाडी, आशा सेविकांच्या माध्यमातून ग्राम बाल विकास केंद्र सुरू करावे, दोन महिने पोषण आहारासाठी निधी खर्च करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. बालकांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत, असे आवाहन बाल विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

हे वाचले का?  कमी बससंख्येमुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंब