दक्षिण कोकणातील प्राचीन जैन तीर्थ !

महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व ५९९ मध्ये चैत्र शुक्ल त्रयोदशीला झाला. या वर्षी ही तिथी ४ एप्रिल २०२३ रोजी म्हणजेच आज मंगळवारी आहे. भारतीय संस्कृती व इतिहास यामध्ये जैन धर्माचे मोठे योगदान आहे.

Jain Pilgrimage Centre इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतीय इतिहासात अनेक आश्चर्यकारक घटना घडल्या. या घटनांनी भारतीय इतिहास व संस्कृती यांना कलाटणी देण्याचे काम केले. इसवी सनपूर्व सहावे शतक म्हणजे आजपासून २८०० वर्षांपूर्वी दोन महान तत्त्ववेत्त्यांनी या भूमीत जन्म घेतला. त्यापैकी एक होते वर्धमान महावीर. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर आहेत. वर्धमान महावीर यांनी इसवी सनपूर्व सहाव्या शतकात जैन धर्माचे पुनरुत्थान केले. जैन धर्माच्या धार्मिक व अध्यात्मिक धारणेनुसार वर्धमान महावीर हे या कल्पातील (युगातील) शेवटचे तीर्थंकर होय. यापूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व सहाव्या शतकापूर्वी जैन परंपरेत २३ तीर्थकर होऊन गेले. वर्धमान महावीर यांचे वडील सिद्धार्थ हे क्षत्रिय कुलीन इक्ष्वाकू राजवंशातील होते तर त्यांची आई त्रिशला ही लिच्छवी गणराज्याची राजकन्या होती. हे दोघेही जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे भक्त असल्याचा संदर्भ जैन साहित्यात सापडतो. महत्त्वाचे म्हणजे महावीरांचा जन्म ज्या इक्ष्वाकू राजवंशात झाला तोच राजवंश प्रभूरामचंद्रांचा देखील आहे. व याच वंशाची स्थापना पहिल्या जैन तीर्थंकरांनी केली अशी धारणा जैन धर्मात आहे.
महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व ५९९ मध्ये चैत्र शुक्ल त्रयोदशीला झाला. या वर्षी ही तिथी ४ एप्रिल २०२३ रोजी म्हणजेच आज मंगळवारी आहे. भारतीय संस्कृती व इतिहास यामध्ये जैन धर्माचे मोठे योगदान आहे. केवळ इतिहासच नाही तर कला, स्थापत्य यांच्या माध्यमातून जैन धर्माने भारतीय संस्कृतीला मोठा अद्भुत वारसा प्रदान केला आहे. या दृश्य स्वरूपाच्या कला व स्थापत्याच्या माध्यमातून भारतीय समृद्ध सांस्कृतिक परंपरेविषयी समजण्यास मदत होते. याच समृद्ध परंपरेतील अनेक दुवे महाराष्ट्र राज्याने आपल्या भूमीत जोपासून ठेवले आहेत. महाराष्ट्र भूमीला जैन तत्त्वज्ञानाची आद्य परंपरा आहे. याच परंपरेतील अनेक 

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी