दलित विद्यार्थी मारहाण प्रकरण : मेघवाल कुटुंबियांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याचा भीम आर्मीचा आरोप; पाण्याच्या टाकीवर चढत केले आंदोलन

पाण्याच्या भांड्याला हात लावल्यावरून राजस्थानमध्ये इंद्रकुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली होती.

पाण्याच्या भांड्याला हात लावल्यावरून राजस्थानमध्ये इंद्रकुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी मेघवाल कुटुंबियांनी केली होती. मात्र, सरकारने त्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आज भीम आर्मीच्या चार दलित नेत्यांनी राजस्थान विधानसभेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या सरकारी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केले आहे. मेघवाल यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी भीम आर्मीच्या नेत्यांनी केली आहे.

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

पाण्याच्या टाकीवर चढत भीम आर्मीचे आंदोलन

मेघवाल यांच्या कुटुंबियांच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्या, या मागणीसाठी भीम आर्मीच्या चार नेत्यांनी पहाटेपासूनच पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केले. बागचंद बेरड, लक्ष्मीकांत, बनवारीलाल आणि रवी कुमार अशी या नेत्यांची नावे आहे. जोपर्यंत मेघवाल कुटुंबियांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सुरूच ठेऊ, असेही या नेत्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात जयपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?

नेमकं काय आहे प्रकरण?

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सायला पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सुराणा गावात इंद्रकुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याने पाण्याच्या भांड्याला हात लावण्याने शिक्षकाने त्याला मारहाण केली होती. गेल्या २४ दिवसांपासून त्याच्यावर अहमदाबामध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

MORE STORIES ON