दिलासादायक : राज्यात करोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले

राज्यातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटल्याची माहिती आजच्या दिवसभरातील आकडेवारीमधून समोर आली आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यावरुन राज्यात करोनाच्या संसर्गाचे काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

या माहितीनुसार, राज्यात आज ४३०४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर नव्याने ४६७८ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण १७,६९,८९७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६१,४५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.१ टक्के झाले आहे.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?

पुण्यात दिवसभरात ३०२ रुग्ण आढळले, ७ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात ३०२ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आज अखेर एकूण रुग्णसंख्या १,७४, ७५४ इतकी झाली आहे. तर आज ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या ४ हजार ५५६ इतकी झाली आहे. दरम्यान, २९३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आजअखेर १,६५, २४६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.