दीड हजार किलो गोमांस जप्त

चालक रहीम शेख सरफुद्दीन शेख (३०, आझाद नगर, धुळे) याच्या विरुध्द पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता वृत्त विभाग

पिंपळगाव बसवंत: मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा शिवारात जवळपास दीड हजार किलो गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पकडण्यात पिंपळगाव पोलिसांसह गोरक्षकांना यश आले. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पिकअप वाहनासह जवळपास सव्वा चारलाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हे वाचले का?  उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान

चांदवडकडून नाशिकच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारे वाहन रात्रीच्या सुमारास शिरवाडे फाटा परिसरातून जाणार असल्याची माहिती पिंपळगाव पोलिसांना गो रक्षकांनी दिली. या आधारे पोलिसांनी तातडीने शिरवाडे फाटा व पिंपळगाव टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्तात वाढ केली. शिरवाडे फाटा परिसरात रात्री भरधाव सफेद रंगाचे बोलेरो पिकअप वाहन जात होते. या वाहनाची तपासणी केली असता त्यात गोमांस आढळून आले.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

चालक रहीम शेख सरफुद्दीन शेख (३०, आझाद नगर, धुळे) याच्या विरुध्द पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडुन सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे दीड हजार किलो गोमांस, दोन लाखाची पिकअप वाहन असा जवळपास चार लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे अधिक तपास करत आहे.