२४ तासात देशभरात एकूण ७०२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू.
देशात करोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची गती मंदावली आहे. पण अजूनही हा आजार पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. मागच्या २४ तासात देशात ५५ हजार ८३८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ७७ लाख सहा हजार ९४६ जणांना करोनाची बाधा झाली आहे. २४ तासात देशभरात एकूण ७०२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला.
करोनामुळे आतापर्यंत देशात १ लाख १६ हजार ६१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या करोनाच्या सात लाख १५ हजार ८१२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत ६८ लाख ७४ हजार ५१८ रुग्ण करोनामुक्त झालेत.
मागच्या २४ तासात ७९ हजार ४१५ रुग्णांना हॉस्पिटमधून डिस्चार्ज मिळाला आहे. बुधवारी देशात ५४ हजार ४० नवे करोना रुग्ण आढळले होते, तर ७१७ मृत्यूंची नोंद झाली होती.