नारायण राणेंचा कोथळा बाहेर काढण्याचं शिवसेना आमदाराचं प्रक्षोभक विधान!

भाजपा नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया; तक्रार देखील दाखल केली जाणार

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेलेल्या खळबळजनक विधानवरून अगोदरच महाराष्ट्रातील राजकारणत तापलेलं असताना व भाजपा आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष काल पाहायला मिळालेला असताना, आता यामध्ये आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. शिवसेनेचे हिंगोलीमधील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. तर, भाजपाने आता याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात ठरवलं असून, तक्रार देखील दाखल केली जाणार आहे. त्यामुळे राजकारणातील खळबळजनक वक्तव्यांची मालिका ही थांबलेली नसल्याचं दिसून येत आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

नारायण राणेंवर टीका करताना शिवसेना आमदारसंतोष बांगर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ”अरे तू काय सांगतो कुठं यायचं कुठं यायचं. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझं पोलीस संरक्षण थोडसं बाजूला कर, हा संतोष बांगर शिवसेनेचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एकटा येऊन, तुला चीत नाही केलं, तुझा जर कोथळा बाहेर नाही काढला, तर संतोष बांगर म्हणू नको.”

हे वाचले का?  Sanjay Raut : “मातोश्रीवर आलेले मुस्लिम लोक एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक, आम्ही..”; संंजय राऊत यांनी फोटो दाखवत केला ‘हा’ आरोप

आमदार संतोष बांगर यांचे हे वादग्रस्त विधान आज समोर आल्यापासून भाजपा नेत्यांकडून यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवाय आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात भाजपा तक्रार देखील दाखल करणार आहे. हिंगोली विधानसभेचे भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी ही माहिती दिली आहे. तर, संतोष बांगर यांच्याकडून या अगोदर देखील वादग्रस्त विधानं करण्यात आलेली आहेत.