नाशिकमध्ये शनिवारी पाणी पुरवठा बंद

महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा विभाग यांच्या वतीने तांत्रिक कामांमुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नाशिक : महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा विभाग यांच्या वतीने तांत्रिक कामांमुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मनपाचे गंगापूर धरण पंपिंग केंद्र येथे महावितरण कंपनीकडील सातपूर येथील १३२ के.व्ही. आणि महिंद्रा येथील दोन फिडरवरुन वीजपुरवठा घेण्यात आला आहे.

हे वाचले का?  Stampede Breaks Out at Maha Kumbh : मौनी अमावस्येला महाकुंभ येथे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता; आजचे शाही स्नान रद्द!

या ठिकाणी पंपिंगद्वारे बाराबंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरीबाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या जलशुध्दीकरण केंद्रांना पाणी पुरवठा करण्यात येतो. तसेच मनपाच्या मुकणे येथील पंपिंग केंद्रात महावितरण कंपनीकडील गोंदे येथील रेमण्ड उपकेंद्रातून वीजपुरवठा कार्यान्वित आहे. गंगापूर धरणातील पंपिंग केंद्रात काही तांत्रिक काम करण्यात येत असून या कामात अडचणीच्या ठरणाऱ्या वाहिनींचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शनिवारी संपूर्ण शहर परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरिकांनी नोंद घेऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे वाचले का?  पक्षांतर्गत मतभेदामुळे नाराज राज ठाकरे मुंबईला परत, दीड दिवसातच नाशिक दौरा आटोपता