नाशिकमध्ये २२४ किलो बनावट पनीरसह मिठाई नष्ट, अन्न औषध प्रशासनाची कारवाई

सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने दुग्धजन्य तसेच इतर पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्याने अशा पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकारही घडत आहेत.

नाशिक : सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने दुग्धजन्य तसेच इतर पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्याने अशा पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकारही घडत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरात केलेल्या कारवाईत ५९ हजार ४५० रुपयांचे २२४ किलो बनावट पनीर आणि मिठाई जप्त करुन मुद्देमाल नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने देवळाली कॅम्प येथील जसपालसिंग कोहली यांच्या मिठाई पेढीची तपासणी केली असता पेढीत अत्यंत अस्वच्छ वातावरणात पनीरची साठवणूक केल्याचे दिसून आले. संशयावरून अन्न नमुना विश्लेषणासाठी घेत उर्वरीत ३७ हजार ७३० रुपयांचा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला.

हे वाचले का?  उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान