नाशिक : आठ महाविद्यालयांना आरोग्य विद्यापीठाची संलग्नता

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सात वैद्यकीय आणि एका दंत महाविद्यालयातर्फे त्रुटी पूर्तता करण्याबाबत हमीपत्र सादर करण्यात आल्याने या महाविद्यालयांना संलग्नता देण्यात आली आहे.

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सात वैद्यकीय आणि एका दंत महाविद्यालयातर्फे त्रुटी पूर्तता करण्याबाबत हमीपत्र सादर करण्यात आल्याने या महाविद्यालयांना संलग्नता देण्यात आली आहे. या महाविद्यालयांच्या एकूण एक हजार जागांसाठी प्रवेश घेणे शक्य होणार आहे. विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी यासंदर्भात माहिती दिली. सदर महाविद्यालयांकडे अपुरी शिक्षकसंख्या असल्याने संलग्नतेबद्दल अडचण निर्माण झाली होती.

हे वाचले का?  नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल

महाविद्यालयांमार्फत प्रतिनिधींनी आवश्यक असणाऱ्या शिक्षक संख्येच्या पूर्ततेबद्दल कार्यवाही करण्याचे हमीपत्र विद्यापीठाकडे सादर केले. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यापीठातर्फे सदर महाविद्यालयांना संलग्नता दिली असल्याचे डाॅ. निकुंभ यांनी सांगितले. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला विद्यापीठातर्फे महाविद्यालय आणि त्यांच्या प्रवेश क्षमतेबद्दल कल्पना देण्यात आल्याचे सांगितले.

यामध्ये तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, तेरणा मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल नेरूळ, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे वैद्यकीय महाविद्यालय, रायगड येथील डॉ. एन. वाय. तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च सेंटर, अमरावती पंजाबराव भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज, सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर, धुळे येथील जवाहर मेडिकल फाऊंडेशनचे ए.सी.पी.एम. मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल, नवी मुंबई येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे तेरणा कॉलेज यांचा समावेश आहे.