नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर

फेब्रुवारीच्या प्रारंभी दुष्काळाची तीव्रता अधोरेखीत होत असून जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणात ३३ हजा्र ९१३ दशलक्ष घनफूट म्हणजे ५१ टक्के जलसाठा आहे.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : फेब्रुवारीच्या प्रारंभी दुष्काळाची तीव्रता अधोरेखीत होत असून जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणात ३३ हजा्र ९१३ दशलक्ष घनफूट म्हणजे ५१ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ७३ टक्के इतके होते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ६५ टक्के जलसाठा आहे.

पावसाअभावी यंदा बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाला नाही. त्यातच समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे काही धरणांमधून पाणी सोडावे लागले. या एकंदर स्थितीत उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे आव्हान आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ३७१४ दशलक्ष घनफूट (६५ टक्के) जलसाठा आहे. या समुहातील काश्यपी १७४० (९३), गौतमी गोदावरी १२६८ (६७), आळंदी ५२१ (६३) असा जलसाठा असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. गतवर्षीचा विचार करता यंदा या धरण समुहात पाच टक्के कमी जलसाठा आहे.

हे वाचले का?  मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान

पालखेड धरणात २२० दशलक्ष घनफूट (३३ टक्के), करंजवण २५६९ (४७), वाघाड ८०४ (३४), ओझरखेड ९६७ (४३), पुणेगाव ३३६ (५३), तिसगाव १३४ (२९), दारणा ३५५६ (५१), भावली ६५७ (४५), मुकणे ३९८९ (५५), वालदेवी १००५ (८८), कडवा ६३० (३७), नांदूरमध्यमेश्वर १६३ (६३), भोजापूर ६८ (१८), चणकापूर १५८० (६५), हरणबारी ७९७ (६८), केळझऱ २८३ (४९), गिरणा ७६४० (४१), पुनद १०९२ (८३), माणिकपुंज ८० (२३) असा जलसाठा आहे. नागासाक्या धरण कोरडेठाक आहे. जलसाठ्याचा विचार केल्यास १० धरणांमध्ये निम्म्याहून कमी म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

गतवर्षीच्या तुलनेत २२ टक्के कमी

जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांची जलसाठ्याची एकूण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट आहे. गेल्या वर्षी धरणांमध्ये ४८ हजार २७६ दशलक्ष घनफूट म्हणजे ७३ टक्के जलसाठा होता. याचा विचार करता यंदा २२ टक्क्यांनी कमी जलसाठा आहे.