नाशिक: जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ – एकाच दिवसात १८ जण संक्रमित

नाशिक बदलत्या हवामानाचा फटका नागरीकांना बसत असून आरोग्य विषयक तक्रारींमध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत करोना सदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे.

नाशिक बदलत्या हवामानाचा फटका नागरीकांना बसत असून आरोग्य विषयक तक्रारींमध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत करोना सदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी एकाच दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत १८ ने वाढ झाली असून त्यापैकी ११ रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. अद्याप नव्या विषाणुचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळलेला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीचा तडाखा बसला. याशिवाय बहुतांश वेळेत ढगाळ हवामान राहत असल्याने जुन्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरूवात झाली आहे. अनेकांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसा खवखवणे अशा आरोग्यविषयक तक्रारी भेडसावू लागल्या आहेत. त्यातच जिल्ह्यातून गेलेला करोनाही पुन्हा हातपाय पसरवू लागला आहे. गुरुवारी नाशिक महानगर पालिका क्षेत्रात ११, नाशिक ग्रमीणमध्ये सहा आणि जिल्हा बाह्य एक असे १८ रुग्णांची वाड एकाच दिवशी झाल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. सध्या ५५ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. करोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता नागरिकांनीही दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

हे वाचले का?  मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सव परंपरा खंडित, रेल्वे प्रशासनाचा असहकार

दरम्यान, नव्या विषाणूचे सावट राज्यावर असतांना जिल्ह्यात मात्र नव्या विषाणूचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. करोनाची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून करोना काळात यापूर्वी ज्याप्रमाणे प्रत्येक जण आरोग्यविषयक नियमांचे पालन करीत होत, त्याप्रमाणेच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून टाळणे, बाहेर जाताना मुखपट्टीचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. खोकला आणि सर्दी

हे वाचले का?  महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध