नाशिक: द्राक्ष उत्पादकाची फसवणूक; तीन संशयितांविरुध्द गुन्हा

चांदवड तालुक्यातील एका द्राक्ष उत्पादकाची २९ लाखाहून अधिक रकमेला फसवणूक करण्यात आली आहे.

नाशिक – चांदवड तालुक्यातील एका द्राक्ष उत्पादकाची २९ लाखाहून अधिक रकमेला फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदवड तालुक्यातील धोडांबे परिसरातील सुभाष रकिबे यांनी संशयित पारस सैनी, मोहंमद इरफान, मोहंमद अली यांच्याशी संपर्क साधला. शेतात असलेले द्राक्षे ४० आणि ४१ रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार २९ लाख ७८ हजार ८९७ रुपयांचा माल रकिबे यांनी संशयितांना विकला. त्या रकमेचा संशयित व्यापाऱ्यांनी धनादेश दिला. मात्र तो वटला नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रकिबे यांनी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा